घरमहाराष्ट्रपुणेशरद पवारांच्या व्हायरल जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "10वीला असताना..."

शरद पवारांच्या व्हायरल जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “10वीला असताना…”

Subscribe

बारामती : सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जात प्रमाणपत्र व्हायरल होत आहे. यात शरद पवार यांच्या दाहावीच्या दाखल्यात ‘ओबीसी’ असा उल्लेख असल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. या व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

शरद पवाराच्या व्हायरल जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा बालिशपणा सुरू असून हे सगळे हास्यास्पद आहे. जेव्हा शरद पवार दहावीला होते. त्यावेळी इंग्रजीमधून जात प्रमाण पत्र दिले जात नव्हते. ते दहावीला असताना त्यांचा दाखला इंग्रजीमध्ये असू शकतो का? असा उलट सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आज काळ खोटी प्रमाणपत्रे बाजारात सर्रास मिळतात.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला, कीर्तिकर-कदम वादावर ठाकरे गटाचा टोला

शरद पवारांविरोधात षडयंत्र

- Advertisement -

व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवार गटाने प्रत्युत्तर देत म्हणाले, शरद पवार यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख आहे आणि शरद पवारांनी कधीही कुणबी प्रमाणपत्र घेतलेले नाही, असे शरद पवार गटाने सांगितले आहे. शरद पवार गट पुढे म्हणाले, शरद पवारांच्या दाखल्यावर ओबीसी असा उल्लेख असणारे प्रमाणपत्र हे बनावट आहे. यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. शरद पवारांचा व्हायरल दाखला हा षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप अजित पवार यांच्या गटाकडून केला जात आहे.

हेही वाचा – दादा गटातील आमदार नाराज, काहीजण BJP मध्ये जाण्याच्या प्रयत्नात; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

राज्य सरकारकडून समितीची स्थापना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकार समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून मराठा समाजाच्या कुणबींच्या तपासणी सुरू आहे आणि ज्या मराठ्यांना नोंदणी सापडल्या आहे. त्यांना राज्य सरकार प्रमाणपत्र देत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -