मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार निवडून आले आहे. यानंतर आता येत्या 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. मात्र दुसरीकडे विरोधक ईव्हीएमवर संशय व्यक्त करत महायुतीवर निशाणा साधताना दिसत आहेत. तसेच पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हण यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (Suraj Chavan venomous criticism of the opposition alleging EVM scam)
सुरज चव्हाण यांनी ट्वीट करताना म्हटले की, विरोधकांची अवस्था “नाचता येत नाही अंगण वाकड” अशी झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लोकांचा विश्वास गमावून बसलेल्या विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा लोकांनी त्यांना का नाकारलं? याचं आत्मचिंतन करावं. निवडणुकीनंतर विरोधात काम केलं म्हणून मित्रपक्षांच्या खासदाराच्या विरोधात आंदोलन करावं लागलं. याशिवाय तिकीट वाटप करताना मारामारी करणाऱ्या विरोधकांना लोक कसे स्वीकारतील, असा टोलाही सुरज चव्हाण यांनी लगावला.
हेही वाचा – Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न
विरोधकांची अवस्था “नाचता येत नाही अंगण वाकड” अशी झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लोकांचा विश्वास गमावून बसलेल्या विरोधकांनी EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं लोकांनी त्यांना का नाकारलं.
निवडणुकीनंतर विरोधात काम केलं म्हणून मित्रपक्षांच्या खासदाराच्या विरोधात आंदोलन करावं…— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) November 30, 2024
या उमेदवारांनी केले फेरमतमोजणीसाठी अर्ज
- विक्रमगडमधील सुनील भुसारा यांनी एका मतपेटीसाठी 47200 रुपये याप्रमाणे 10 बुथच्या फेर मतमोजणीसाठी 472000 हजार रुपये रक्कम चलनाद्वारे जमा केले आहेत.
- बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी 18 बुथचे 849600 रुपये भरले आहेत.
- नालासोपाऱ्याचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी 10 बुथचे 472000 रुपये शुल्क भरले आहे.
- बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांनी 5 बुथसाठी 236000 रुपये जमा केले आहेत.
- वसईमधील काँग्रेसचे विजय पाटील यांनी 5 बुथसाठी 236000 रुपये भरले आहेत.
- फेरमतमोजणीची मागणी केल्यामुळे सरकारकडे एकूण 22,65,600 रुपये जमा झाले आहेत.
हेही वाचा – Uddhav Thackeray : शिंदे दरे गावी गेल्याने ठाकरेंची जहरी टीका; राक्षसी बहुमत मिळाल्यानंतरही…