Homeमहाराष्ट्रSuresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश...

Suresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश धस यांचे आवाहन

Subscribe

आज वाल्मीक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून तो एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलताना दिसत आहे. यासंदर्भात आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटले की, हे प्रकरण भयंकर असून ते पुढचे 15 दिवस चालणार आहे. त्यामुळे ही क्लिप डिलीट करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि बीड पोलिसांबाबत अधूनमधून खुलासा करताना करताना दिसत आहेत. आज वाल्मीक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून तो एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलताना दिसत आहे. यासंदर्भात आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटले की, हे प्रकरण भयंकर असून ते पुढचे 15 दिवस चालणार आहे. त्यामुळे ही क्लिप डिलीट करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Suresh Dhas appeals not to delete Walmik Karad audio clip)

आज समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मीक कराड हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आरोपीला सोडून देण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच बीड जिल्ह्याचा मीच बाप आहे, असेही म्हणत आहे. त्यामुळे या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. नेमके प्रकरण काय? वाल्मीक कराडने कोणत्या महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन केला? तसेच वाल्मीक कराड कोणत्या आरोपीला सोडण्यास सांगत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच सुरेश धस यांनी या ऑडिओ क्लिपवर भाष्य केले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच? दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार

माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस म्हणाले की, या क्लिपचे गांभीर्य तुम्हाला माहीत नाही. पण मला त्याचं गांभीर्य माहीत आहे. वाल्मीक कराडने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला? ही महिला अधिकारी कोण आहे? तो आरोपी कोण आहे? आकाने फोन करण्याचं कारण काय? या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. तुम्ही आधी जाऊन त्यांचा शोध घ्या. नंतर मला प्रश्न विचारा. मग मी तुम्हाला उत्तर देईन. या क्लिपच्या संदर्भात माझ्याकडे भरपूर माहिती आहे. पण याचं उत्तर मी आज देणार नाही, असे धस यांनी स्पष्ट केले.

सुरेश धस पत्रकारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही मुंबईची माध्यमं आहात. तुम्ही मंत्रालयातील पत्रकार आहात. म्हणजे तुम्ही राज्याची पत्रकारिता करता. तुमचे प्रतिनिधी जिल्ह्यात आहेत. त्यांना बीडला पाठवा. महिला अधिकारी कोण? त्यांनी स्पीकर ऑन का केला? किरकोळ प्रकरण आहे हे आका कुणासमोर बोलला? सोडून दे असं त्याने का सांगितलं? याची चौकशी करा. ही क्लिप 15 दिवस चालणार आहे, हे लक्षात ठेवा. डिलीट करू नका, असे आवाहन सुरेश धस यांनी केला. त्यामुळे आता या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपप्रकरणी आणखी काय नवीन खुलासा होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Beed Police : परळीत काही अधिकारी 20 वर्षांपासून एकाच पोस्टवर, सुरेश धस यांचा रोख कोणाकडे?