घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुजरातमध्ये विलीकरण मागणीवर सुरगाणा ग्रामस्थ ठाम; वासदा तहसीलदारांना दिले निवेदन

गुजरातमध्ये विलीकरण मागणीवर सुरगाणा ग्रामस्थ ठाम; वासदा तहसीलदारांना दिले निवेदन

Subscribe

सुरगाणा : राज्यात महाराष्ट्र कर्नाटक वाद धुमसत असतांना नाशिकच्या सुरगाणा तालुकयातील ग्रामस्थांनीही गुजरातमध्ये सामाविष्ट करण्याबाबत ठाम भूमिका घेत थेट गुजरात गाठले. सोमवारी ग्रामस्थांनी वासदा तहसीलदारांना निवेदन देत गुजरातमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली.

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव गुजरात जाण्याच्या मुद्दयांवर ठाम असून सोमवारी त्यांनी थेट गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात धडक मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांच्यां नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक असल्याने वीज, पाणी, रस्ते, आरोग्य शिक्षण आशा मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी उठाव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आधी सुरगाणाच्या तहसीलदारांना निवेदन देत मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वासदा तालुक्यातील तहसील कार्यालय गाठले.

- Advertisement -
समस्या काय ?
  • हंडाभर पाण्यासाठी महिलांना मध्यरात्री भटकंती करावी लागते
  • आरोग्य सुविधांचा अभाव
  • उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना
  • गुजरात गाठावे लागते
  • रस्त्यांची झालेली दूरवस्था
  • मूलभुत सोयी सुविधांचा अभाव
संघर्ष समिती स्थापन

नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या 55 गावांना गुजरातमध्ये जायचे आहे. त्यासाठी त्यांनी गुजरातमधल्या वासदाच्या तहसीलदारांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. तसेच गुजरातमध्ये सामावून घ्या, अशी मागणी केली. त्यासाठी या गावांनी गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची स्थापनासुद्धा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -