घरताज्या घडामोडीनेपाळच्या नोटा छपाईचे कंत्राट मिळवण्यात भारताला यश; 'या' देशांना टाकले मागे

नेपाळच्या नोटा छपाईचे कंत्राट मिळवण्यात भारताला यश; ‘या’ देशांना टाकले मागे

Subscribe

जागतिक पातळीवरील कंत्राट घेण्यामध्ये नेहमीच चढाओढ पाहायला मिळते. विशेषत: कंत्राट मिळवण्यात मोठे देश अग्रेसर असतात. शक्यतो असे कंत्राट हितसंबंधांवरच दिले जात असल्यामुळे कंत्राट घेण्याची फारशी स्पर्धा होत नाही. मात्र, नव्याने निर्माण झालेले देश यामध्ये कंत्राट काढू लागले आहेत.

जागतिक पातळीवरील कंत्राट घेण्यामध्ये नेहमीच चढाओढ पाहायला मिळते. विशेषत: कंत्राट मिळवण्यात मोठे देश अग्रेसर असतात. शक्यतो असे कंत्राट हितसंबंधांवरच दिले जात असल्यामुळे कंत्राट घेण्याची फारशी स्पर्धा होत नाही. मात्र, नव्याने निर्माण झालेले देश यामध्ये कंत्राट काढू लागले आहेत. यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी नेपाळने नोटा छपाईचे कंत्राट (Nepal Currency Printing Contract) काढले होते. ते कंत्राट मिळवण्यासाठी चीन, फ्रान्स आणि भारत मुख्य स्पर्धेत होता. त्यामुळे चीन किंवा फ्रान्स यामध्ये बाजी मारेल अशी स्थिती असतांना भारताने बाजी मारली आहे.

नाशिक रोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयाला नेपाळच्या १ हजाराच्या ४३० दशलक्ष नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. याआधी ५० रुपयाच्या ३०० दशलक्ष नोटा छापण्याचे वेगळे कंत्राटही मिळाले आहे. त्यामुळे आता एकूण ७३० दशलक्ष नोटा छापण्याचा करार नेपाळबरोबर झाला आहे. याबाबत मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी माहिती दिली. (Surpassing China Nashik Will Press To Print Nepal Currency Notes Nashik)

- Advertisement -

केंद्र सरकारने डिजिटल रुपयाला प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे. त्यामुळे बँकिंग आणि नोट प्रेस क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच इतर छोट्या देशांच्या नोटा आणि सिक्युरिटी फिचर्सचे उत्पादन संधी बघण्याची विनंती संघाने प्रेस व्यवस्थापनाला केली होती. त्याला व्यवस्थापनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नेपाळच्या नोटा छापण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले.

दरम्यान, पासपोर्ट, मुद्रांक, धनादेश, लिकर सील छापणाऱ्या आयएसपी तसेच नोटा छापणाऱ्या सीएनपी प्रेसच्या मशिनरीचे आधुनिकीकरनाची मागणी मजदूर संघाने केली होती. नेपाळच्या नोटांबरोबरच भारताच्या एकूण ५३०० दशलक्ष नोटा छपण्याचे मोठे कामही प्रेसला मिळाल्याने या सर्व नोटा एक वर्षात छापून द्यायच्या असून कामगार त्यासाठी सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार – आदित्य ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -