घरमहाराष्ट्रगडचिरोलीत ५ नक्षलींचे आत्मसमर्पण

गडचिरोलीत ५ नक्षलींचे आत्मसमर्पण

Subscribe

२५ लाखांचा होता इनाम, तीन महिला नक्षलींचा समावेश

गडचिरोली पोलिसांसमोर मंगळवारी पाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर सुमारे २७ लाख रुपयांचा इनाम ठेवण्यात आलेला होता. याआधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबुजमाडमध्ये घुसून गडचिरोली पोलीस दलाच्या सी -६० जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. यात दोन नक्षलवादी ठार, तर चार गंभीर जखमी झाले होते.या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे.

नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह २ डिसेंबर रोजी सुरु झाल्यानंतर या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी पोलीस पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या केली होती. एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे ही घटना घडली होती. शिवाय, नक्षलवाद्यांनी कमलापूर येथे हत्ती कॅम्पमध्ये साहित्यांची आणि शेडची देखील तोडफोड केली होती. हा सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी सप्ताहाच्या दोन-तीन दिवस अगोदरपासून विविध ठिकाणी पत्रके आणि बॅनर्स बांधून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षलींनी लावलेले बॅनर आणि पत्रकांची होळी करून ‘नक्षलवादी मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -