Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे रेडबसचे सर्वेक्षण; देशातील 10 बिझी मार्गांमध्ये मुंबई-पुणे महामार्गाचा समावेश

रेडबसचे सर्वेक्षण; देशातील 10 बिझी मार्गांमध्ये मुंबई-पुणे महामार्गाचा समावेश

Subscribe

मुंबई-पुणे महामार्गाचा देशातील 10 बिझी मार्गांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. रेडबसने यंदाच्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे महामार्ग म्हणजे या दोन्ही शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा. 2002 मध्ये हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी कायमच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. त्यामुळे एका सर्वेक्षणानुतून समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गाचा देशातील 10 बिझी मार्गांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. रेडबसने यंदाच्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 2022 या वर्षीच्या तुलनेत 2023 या वर्षी या महामार्गावर वाहनांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई-पुणे महामार्ग सुरू झाल्यापासून गेल्या 20 वर्षात या मार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज या मार्गावर किमान 50 हजारे वाहने धावतात. तर सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी वाहनांचा आकडा 70 ते 80 हजारांवर जातो. लहान वाहनांपासून ते मोठ्या वाहनांपर्यंत प्रत्येक चालक या मार्गाचा वापक करतो. सहा लेन असलेला हा महामार्ग 94.5 किमीचा आहे. मुंबई-पुणे महामार्ग नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होतो आणि पुण्यातील किवळे येथे संपतो.

- Advertisement -

हेही वाचा – सट्टेबाजीसंबंधित जाहिरातींवर होणार कारवाई; केंद्राकडून राज्यांना निर्देश

रेडबसने ऑनलाईनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले आणि याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. रेडबस या ऑनलाईन साईटवर खाजगी बसेससहित एसटी महामंडळाच्या बसेसचे ऑनलाईन तिकीट बूक करता येते. त्यामुळे कोणत्या महामार्गावर सर्वाधिक बसेस धावतात. लोक कोणत्या महामार्गावर सर्वाधिक प्रवास करतात, याबाबतचा अभ्यास रेडबसकडून करण्यात आला. ज्यानंतर त्यांनी देशातील 10 सर्वात व्यस्त असणाऱ्या महामार्गांमध्ये मुंबई-पुणे महामार्गाचा समावेश असल्याचे सांगितले. या मार्गावर तीन हजारपेक्षा जास्त ट्रॅव्हल्सची वाहतूक होते.

- Advertisement -

मुंबई-पुणे महामार्ग की ‘अपघातमार्ग’?
या महामार्गाचा समावेश देशातील 10 व्यस्त महामार्गांमध्ये करण्यात आलेला असला तरी गेल्या काही महिन्यात या मार्गावरील अपघातामध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमवला आहे. अनेक बेशिस्त वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहन चालवत असल्याने या मार्गावर अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -