घरमहाराष्ट्रराज्यातील महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार, भंडारा बलात्कारप्रकरणी सुषमा अंधारे संतप्त

राज्यातील महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार, भंडारा बलात्कारप्रकरणी सुषमा अंधारे संतप्त

Subscribe

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसनेने सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडून याप्रकरणी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. समितीतील सदस्य घटनास्थळी गेले तेव्हा आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं निष्पन्न झालं आहे. ३१ जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या आरोपीला अद्यापही ताब्यात घेतलं नसल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, राज्यातील महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

३१ जुलै रोजी गोरेगाव तालुक्यातील एका महिलेवर मध्यरात्री बलात्कार झाला. हे प्रकरण अत्यंत किचकट असल्याने पोलिस अद्यापही आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. याप्रकरणी माहिती घेण्याकरता शिवसेनेकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक गेले सहा दिवस पोलीस ठाण्यातच आले नसल्याची माहिती मिळाली. यावरून सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला. तसेच, भंडारा प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून राज्यातील महिला अत्याचाराविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचंही अंधारे यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मनासारखे काम होत नाही म्हणून ते गेले सहा महिने पोलीस ठाण्यात आले नाहीत. आरोपींनाच ताब्यात घेतलं नाहीय अजून तर प्रकरण फास्ट टॅगमध्ये कसं चालवणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -