घरमहाराष्ट्रनिलेश राणेंच्या 'या' कौशल्यावर अंधारेंचा विश्वास; म्हणाल्या, गांधीवाद, गोडसेवाद, आंबेडकरवादी...

निलेश राणेंच्या ‘या’ कौशल्यावर अंधारेंचा विश्वास; म्हणाल्या, गांधीवाद, गोडसेवाद, आंबेडकरवादी…

Subscribe

मुंबई – राजकारणाची पातळी खालावत चालली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी आम्ही काही गांधीवादी नाही, जशास तसं उत्तर देतो, असं म्हणाले होते. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निलेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तुमच्या व्यवहारवादी कौशल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

आज त्यांनी ट्वीट करत निलेश राणे यांच्यावर टीकास्त्र डागलं. निलेश राणे तुम्ही खरं बोललात तुम्ही गांधीवादी नाहीत. पण तुम्ही गोडसेवादी ही नाहीत. आंबेडकरवादी तर नाहीच नाही..! तुम्ही तर खरे फायद्याचं राजकारण करणारे व्यवहारवादी आहात आणि तुमच्या या कौशल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं ट्वीट करत सुषमा अंधारे यांनी निलेश राणेंवर टीका केली.

- Advertisement -


निलेश राणे काय म्हणाले होते?

सुषमाताई अंधारे माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत. तरी आम्ही त्यांना ताई म्हणतो. मोठ मोठ्या नेत्यांबद्दल त्यांच्या भाषणात काय उल्लेख होतो हे सर्वांना माहित आहे. अंधारे ताई जे बोलतात तेही तपासून घेतले पाहिजे. कोणत्या पातळीच्या टीका करतात. आपण कोण आहे, समोरचा कोण आहे याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. राजकारणाची पातळी खाली नेण्यास संजय राऊतांनी सुरुवात केली. त्यांच्या जीभेला हाड नाही. त्यामुळे अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच. कोणी ऐकून घ्यायला बसलेलं नाही. ते काहीही बोलले, कोणत्याही भाषेत बोलले तर आम्ही ऐकून घेऊ शकत नाही. सामंजस्याने किती घेणार? कोणी समोरून शिव्या घालतोय तर आम्ही गांधीवादी नाही की एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे द्यायला, असं निलेश राणे म्हणाले. आज ते बीडमध्ये बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -