सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात NCB कडून रियावर ठपका

या प्रकरणातील आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर करून थेट रिया चक्रवर्तीवर ठपका ठेवला आहे. त्याच बरोबर सुशांतला ड्रग्ज पुरविलेआणि ड्रग्जचे व्यसन लावण्यातही रियाचा हात होता असा दावा या मसुद्यात करण्यात आला आहे.

sushant singh rajput

बॉलिवूड मधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला त्या घटनेला जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली तरीही त्या प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. या प्रकरणासंदर्भांत अनेक घडामोडी सुद्धा घडल्या, अनेक चर्चा सुद्धा सुरु होत्या. पण काही काळानंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण चर्चेतून पूर्णतः विलग झाले. पण आता एनसीबीने आरोपपत्र न्यायालयात सादर केल्याने या प्रकरणावरची धूळ झटकली गेली. या प्रकरणातील आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर करून थेट रिया चक्रवर्तीवर ठपका ठेवला आहे. त्याच बरोबर सुशांतला ड्रग्ज पुरविलेआणि ड्रग्जचे व्यसन लावण्यातही रियाचा हात होता असा दावा या मसुद्यात करण्यात आला आहे.

हे ही वाचा – बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर बंडखोरांचा समाचार घेतला असता : संजय राऊत

सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात सुशांतला त्याची प्रेयसी रिया चक्रवतीसह इतर आरोपींनी ड्रग्ज पुरविल्याचा आरोप केला आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्येसह ड्रग्जचा तपास सीबीआयसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरू आहे. याच प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 35 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले असून त्यात रियासह तिचा भाऊ शौविक आणि इतर आरोपींचा समावेश आहे.

हे ही वाचा – शरद पवारांकडून शिवानी बावकरचं विशेष कौतुक, पोस्ट शेअर करत शिवानी म्हणाली…

याच गुन्ह्यात या आरोपींना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याच चौकशीदरम्यान ड्रग्जची लिंक बॉलिवूडपर्यंत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे काही अभिनेत्यासह अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. याचप्रकरणी एनसीबीने पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. त्यात मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधीत गुन्हेगारी कट रचून ड्रग्ज खरेदी करण्यात आले होते. ते ड्रग्ज उच्च सोसायटीसह बॉलिवूडमध्ये वितरीत करण्यात आले होते. या आरोपींनी ड्रग्ज खरेदीसह त्याचे सेवन केले होते असे एनसीबीने आरोपपत्रात म्हटले आहे.
दरम्यान एनसीबीने हा मसुदा न्यायालयात सादर केला आहे. त्याचा आढावा घेऊन कोणत्या आरोपांखाली आरोपींवर खटला चालवायचा यासंदर्भांत न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा – येत्या ३ महिन्यांत केएल राहुल आणि अथिया यांचा मुंबईत पार पडणार विवाह…