Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सुशांतची हत्या की आत्महत्या? देशमुख यांचा सवाल

सुशांतची हत्या की आत्महत्या? देशमुख यांचा सवाल

सुशांतची हत्या की आत्महत्या? असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण गाजत आहे. या मुद्द्यावरुन अनेक राजकीय वादविवाद देखील झाले असून अनेक प्रकरण समोर आली आहेत. त्यातच आता सुशांतची हत्या की आत्महत्या असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. सुशांतच्या हत्येनंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही.

सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. त्याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले. सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? त्याचबरोबर हत्या असल्याचंही म्हटलं होतं. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही.

काय म्हणाले अनिल देशमुख?

सीबीआयच्या तपासाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले आहे की, ‘सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत’.


- Advertisement -

हेही वाचा – एकजण म्हणतो मी परत येईन अन् दुसरे म्हणतात परत जाईन!


 

- Advertisement -