घरमहाराष्ट्रSushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही...

Sushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही – सुशीलकुमार शिंदे

Subscribe

अशोक चव्हाण यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला आणि त्यांनी तो मंजूर देखील झाला आहे.

मुंबई : पक्षातून नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर दिली आहे. अशोक चव्हाण यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला आणि त्यांनी तो मंजूर देखील केला आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा स्वीकारल्यानंतर विधिमंडळाने अधिशूचना देखील जारी केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीवर सुशील कुमार शिंदे म्हणाले, “काँग्रेसमधून नेते जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इंडिया शाइनिंगच्या वेळी देखील सर्व जण पक्ष सोडून जात होते. त्यावेळी पक्षासोबत जे राहिले ते मोठ्या जिद्दीने लढले आणि आमचे सरकार आले. यावेळी देखील असेच काही तरी होईल, असा विश्वास सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेहीव वाचा – Maharashtra Politics : ‘ऑपरेशन लोटस’च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज; थोरात स्पष्टच बोलले

पुढील दोन दिवसांत माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला कारण असलचे पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करून पुढची दिशा ठरवेन. तसेच, मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -