घरमहाराष्ट्रशरद पवारांसमोर सुषमा अंधारेंना अश्रू अनावर; अजित पवारांची तक्रार करत म्हणाल्या...

शरद पवारांसमोर सुषमा अंधारेंना अश्रू अनावर; अजित पवारांची तक्रार करत म्हणाल्या…

Subscribe

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर अक्षरश: रडल्या. सुषमा अंधारे यांनी भर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केली.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर अक्षरश: रडल्या. सुषमा अंधारे यांनी भर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्याला आलेले अनुभव सांगताना सुषमा अंधारे यांनी रडू कोसळलं. तसचं, त्या म्हणाल्या की माझ्याविरोधात अश्लाघ्य बोललं गेलं त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सभाहात बोलायला हवं होतं, असं म्हणत सुषमा अंधारे भावूक झाल्या. ( Sushma Andhare breaks down in tears in front of Sharad Pawar and complained about Ajit Pawar )

भटक्या विमुक्तांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मला भटके जास्त विस्थापित झाले आहेत. इतक्या जाती आहेत तर काहींना अशीपण जात आहे का? असं आश्चर्य वाटतं. वडार पूर्वी गावगाड्यात पाटा, वरवंटा, जातं तायर करायचा. गावात ओरडून विकायचा, गाव त्याला बलुतं द्यायचं. पण आता कोणी पाटा, वरवंट विकत घेत नाही. वडारपूर्वी दगड फोडायचा. तुम्ही एक दगड फोडून पाहिलं तर डोळ्यांत किर्ती छर्रे जातात हे कळेल. संपूर्ण दिवसाला ढीग संपवायचे आणि सांगेल त्या आकाराचे खडी करायचे. पण स्ट्रोन क्रशमुळे त्यांच्या हातातील काम केलं. आता मिक्सर आल्यामुळे पाटा, वरवंटा कोणी घेत नाही. गावात काम नसल्याने शहरात आल्यावर इथलं इंग्रजी त्यांना कळत नाही. हीच अवस्था दुरड्या, सुपं, टोपली तयार करणाऱ्यांची आहे, अशी खंत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

अजित पवारांची केली तक्रार

सर इथे राजकारणाचा विषय नाही. पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. अश्लाघ्य पद्धतीने जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होतं सर, सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तक्रार का लिहून घेतली नाही? खरं की खोटं? पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे. तरीसुद्धा सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न विचारयला हवा होता, असं म्हणत सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -