Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : ओबीसी महिला मुख्यमंत्री झाली तर आनंदच, पण...; सुषमा अंधारेंची...

Maharashtra Politics : ओबीसी महिला मुख्यमंत्री झाली तर आनंदच, पण…; सुषमा अंधारेंची भाजपावर टीका

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली आहे. यानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून राज्याच्या राजकारणात चर्चा होताना दिसत आहे. अशातच ठाकरे गटाच्या उपमुख्यमंत्री सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री पदासाठी महिला नेत्याचे नाव सुचवले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली आहे. यानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून राज्याच्या राजकारणात चर्चा होताना दिसत आहे. अशातच ठाकरे गटाच्या उपमुख्यमंत्री सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री पदासाठी महिला नेत्याचे नाव सुचवले आहे. (Sushma Andhare criticizes BJP and demands OBC woman as Chief Minister)

सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, साम-दाम-दंड-भेद आणि कटकारस्थान मॅनेजमेंट सगळं करून एकदाची महाविनाश युती जिंकली. आता चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्री पदाची. तसं पाहिलं तर भाजपासोबत अपक्ष आले तरीसुद्धा ते स्वतःच्या जीवावर सरकार बनवू शकतात. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांची भाजपला गरज पडणार नाही. पण जर भाजपाचं सरकार येणारच असेल तर मग महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या ओबीसी भावंडांनी भाजपाला मतदान केलं, असा भाजपाचा दावा आहे. त्या ओबीसी भावंडांना सत्तेचा वाटा मिळायला हवा, अशी मागणी अंधारे यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा –  Politics : गुवाहाटीला आलेला आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल; एकनाथ शिंदे निवृत्ती घेणार?

- Advertisement -

मुख्यमंत्री करायचाच असेल तर मग तो ओबीसीचा का नको? असा प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये पाच वेळा महिला मुख्यमंत्री होऊ शकते. मात्र प्रचाराच्या वेळेला फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांची आठवण करणाऱ्या मोदी-शहांना महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री द्यायला काय हरकत आहे? ओबीसी महिला मुख्यमंत्री असे एका दगडात दोन पक्षी होऊ शकतात, असे अंधारे यांनी सूचवले.

हेही वाचा – Sharad Pawar : आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने जनतेसमोर जाणार; पवारांचा निर्धार

सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाने पंकजा मुंडे यांचे नाव पुढे करायला हवे. म्हणजे एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या ओबीसींना आणि महिलांना न्याय मिळेल. शिवाय महिला मुख्यमंत्रीपदाचा इतिहास करून दाखवला याची टिमकी वाजवायलाही भाजपा मोकळी. पण भाजपा असं करणार नाही, तिथल्या ओबीसींना नेतृत्व देण्याची जी दानत होती, ती फक्त हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच होती. त्यांनी गोपीनाथ मुंडे किंवा छगन भुजबळ यांच्या रूपाने ओबीसींना संधी दिली होती, अशी आठवण सुषमा अंधारे यांनी करून दिली.


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -