घरमहाराष्ट्रMaha Politics : सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर..., सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना...

Maha Politics : सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर…, सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

Subscribe

अमरावती : भाजपाकडून अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे 2019 ला अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राणा आता 2024 ला भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. 2019 ला अपक्ष निवडून येत नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare criticizes Navneet Rana over joining BJP)

हेही वाचा… NCP : बारामतीत सुप्रिया सुळे अडीच लाख मताधिक्क्याने निवडून येतील; रोहित पवारांचा दावा

- Advertisement -

अमरावती येथील सभेत बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं? महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही.. महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते. आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहणार आहोत,” अशी टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे. यावेळी अंधारे यांनी राणांची नक्कल देखील केली आहे. यामुळे आता आणखी एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, नवनीत आक्कावर हल्ला करणारा आमचा शिवसैनिक पण मंचावर आहे. दोन दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एक लाईन सुरू होती. महाविकास आघाडीमध्ये आलबेल आहे का? इकडे सगळं आलबेल आहे. जिथे आलबेल नाही तिथल्या बातम्यांकडे लक्ष द्यावे, अशी मी अपेक्षा करते. जर मला जात चोरता आली असती तर मला कदाचित अमरावती निवडणूक लढवता आली असती. एका दिवसात रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द होते, पण पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल लागला नाही. निकाल काय लागणार हे माहीत आहे का?, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित करत नवनीत राणा यांना टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -