‘आम्हाला माफ करा…’, सुषमा अंधारेंचे शिवरायांना भावनिक पत्र

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याची आज (19 फेब्रुवारी) जयंती आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे शिवनेरी गडावर आज राज्याच्या पर्यटन विभागाकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Sushma Andhare

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याची आज (19 फेब्रुवारी) जयंती आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे शिवनेरी गडावर आज राज्याच्या पर्यटन विभागाकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मत्र्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे यांनी छत्रपती शिवरायांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare emotional letter on the occasion of Shiv Jayanti)

सुषमा अंधारेंचे पत्र

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,

आम्हाला माफ करा..
आज तुमच्या जन्मदिनी,
स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..

तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय,
असे कधीही घडले नाही…
पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,
असे वचन आम्ही तुम्हाला देतो..

शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच,
फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या!
स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या!
आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!

हर हर महादेव !!
तुमचा खरा मावळा,
सच्चा शिवसैनिक.


हेही वाचा – संजय राऊत यांच्या टिप्पणीवरून आशीष शेलारांना लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचे स्मरण