भाजपची नवी खेळी, सुषमा अंधारेचे पती शिंदे गटात जाणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त वैजनाथ वाघमारे पती 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश करणार आहेत. वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश ही भाजपाची मोठी राजकीय खेळी मानली जात असून, सुषमा अंधारेंसाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त वैजनाथ वाघमारे पती ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश करणार आहेत. वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश ही भाजपाची मोठी राजकीय खेळी मानली जात असून, सुषमा अंधारेंसाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. वैजनाथ वाघमारे आजच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारणही स्पष्ट केले. (Sushma Andhare Ex Husband Vaijnath Waghmare Will Join Shinde Group)

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित रविवारी दुपारी एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशाबाबत वैजनाथ वाघमारे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ नाहीत. त्यांना मीच घडवलं आहे”, असा दावा केला. तसेच, “आजचा आनंदाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे मी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे वाघमारे यांनी सांगितले. शिवाय, रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवेश होत असल्याचे वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं.

“सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. ही विचाराची लढाई आहे. त्यांना ते विचार आवडले त्या तिकडे गेल्या. मला एकनाथ शिंदेंचे विचार आवडले. एकनाथ शिंदे यांचा विद्रोही, क्रांतिकारक स्वभाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे. ही विचाराची लढाई आहे”, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, “सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी “सुषमा अंधारे तोफ वगैरे काही नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक दृष्टा परिपक्व करणारा मीच आहे. ते बघू नंतर. आज आपल्याला काम करायचे आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून 5 ते 7 वर्षापासून मी विभक्त राहतो आहे”, असा दावाही वैजनाथ वाघमारे यांनी केला. दरम्यान, वैजनाथ वाघमारे यांच्या या वक्तव्यावर सुषमा अंधार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – अमोल कीर्तिकर आमच्यासोबत असल्याचा मला दुप्पट आनंद; संजय राऊतांची प्रतिक्रिया