घरमहाराष्ट्रSushma Andhare : आधी सरडा तर आता सरपटणाऱ्या प्राण्याची उपमा..., सुषमा अंधारेंच्या...

Sushma Andhare : आधी सरडा तर आता सरपटणाऱ्या प्राण्याची उपमा…, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर फडणवीस

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सातत्याने शिंदे गट आणि भाजपा, विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उपस्थितीचा वाद गुरुवारी रंगलेला असताना, सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यात त्यांनी ‘सरड्या’ची उपमा दिली होती. तर आज, शुक्रवारी त्यांना अप्रत्यक्षपणे ‘सरपटणारा प्राणी’ म्हटले आहे.

हेही वाचा – Winter Session : विरोधकांच्या अनुपस्थितीत तीन विधेयके मंजूर, मविआ नेते विधानसभा अध्यक्षांवर नाराज

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे या अधिवेशनाला हजर राहिले आहेत. विधानसभेत ते थेट सत्ताधारी बाकांवर बसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते भाजपाच्या रडारवर होते. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप असल्याने मागील मविआ सरकारच्या काळात विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाले असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात ट्वीट केले होते. पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपाने केले. त्याच संजय राठोड यांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले. तेच देवेंद्र फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते, असा प्रश्न विचारतात? देवेंद्रभाऊ सरडासुद्धा आत्महत्या करेल हो, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

हेही वाचा – Winter Session : नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी उभारली जाणार “क्विक रिस्पॉन्स सिस्टिम”

तर आज, शुक्रवारी त्यांनी फडणवीस यांना सरपटणाऱ्या प्राण्याची उपमा दिली आहे. वारूळ मुंग्या बांधतात, पण ते तयार झाले की राहायला मात्र सरपटणारे प्राणी येतात! भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनगिणत कार्यकर्त्यांनी मुंग्या होऊन भाजपाच्या सत्तेचे वारूळ बांधले. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे वारुळात राहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Winter Session : आशिष शेलार यांनी बालमृत्यूच्या प्रमाणावरून तानाजी सावंतांना पकडले कात्रीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -