घरमहाराष्ट्र"भाजपने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांचा वापर करून..." सुषमा अंधारे बरसल्या

“भाजपने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांचा वापर करून…” सुषमा अंधारे बरसल्या

Subscribe

यापुढे बोलताना सुषमा अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही बसरल्या.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. यात लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर आदी नेत्यांना भाजप पक्षाने वापरून घेत बाजूला केल्याचं सांगत सुषमा अंधारेंनी शिंदे-भाजपचा खरपूस समाचार घेतला.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे टिकास्त्र सोडलंय. भाजपने केवळ पंकजा मुंडे यांनाच नव्हे तर अनेक नेत्यांचा वापर करून घेतला. केंद्रीय राजकारणापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंत अनेक नेत्यांच्याबाबतीत भाजपची हीच भूमिका राहिल्याचं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या. या नेत्यांकडे असलेल्या वोट बँकेचा भाजपनं पुरेपूर वापर करून घेतल्याचा आरोप देखील सुषमा अंधारेंनी केलाय. भाजपने सुरूवातीला या नेत्यांना आश्वासनं दिली. त्यांना तात्पुरती मंत्री पदेही बहाल केली आहेत. त्यांचा वापर करून झाल्यानंतर हळूहळू त्यांना बाजूला सारलं. यात देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा असल्याचं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय.

- Advertisement -

२०१४ मध्ये वंजारी बेल्टमध्ये पंकजा मुंडे यांना फिरवलं त्यानंतर आता त्यांना बाजूला करण्यात आलं. विनोद तावडे जरा हुशार ठरले. तावडे देवेंद्र भाऊंच्या तावडीतून सुटले. तावडे आता केंद्रात आपल स्थान निर्माण करू पाहत असल्याचंही अंधारे म्हणाल्या.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टार्गेट करत अंधारे म्हणाल्या की, चंद्रशेखर बावनकुळे यांची अवस्था म्हणजे अवघड जागेच दुखणं झालं आहे. त्यांना आता बोलता पण येईना आणि दाखवता पण येईना अशी अवस्था झाली असल्याचं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या. केंद्रीय राजकारणाचा विचार केला तर लालकृष्ण आडवाणी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भाजपसाठी खर्च केलं. त्या आडवाणींना देखील भाजपने बाजूला केलं. तर सुषमा स्वराज्य यांचा शेवटचा काळ मोदी शहा यांनी वेदनादायी केला. तोच कित्ता देवेंद्र फडणवीस गिरवत असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलताना सुषमा अंधारेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही हात घातलाय. नाशिकच्या शेतकऱ्याने रस्त्यावर कोथिंबीर फुकट वाटली. या संदर्भात अंधारे म्हणाल्या की, भंगाराचा भाव 30 ते 40 किलो आहे. रद्दीचा भाव 20 रुपये किलो आहे. पण शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव किती आहे? शेतकऱ्यांनी काल एकर एकर कांद्याची होळी केली, तरी सरकारला घाम फुटत नाही, असा सवाल यावेळी अंधारे यांनी केला.

यापुढे बोलताना सुषमा अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही बसरल्या. “मुख्यमंत्री एमपीएससी आयोग म्हणण्याऐवजी निवडणूक आयोग म्हणतात. ते जेंव्हा पत्रकार परिषद घेतात, तेंव्हा त्यांना जाणीवपूर्वक कॉप्या पुरवल्या जातात, जणू काही आमचे एकनाथ भाऊ ढ आहेत, तर कधी कुणी त्यांचा माईक काढून घेतात. हे म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की, मुख्यमंत्री सक्षम नाही. एकूणच मराठा मुख्यमंत्री सक्षम नाही हेच दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे”, असा आरोप अंधारे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -