घरताज्या घडामोडीचित्रा वाघ चित्रविचित्र बोलतात, संजय राठोड प्रकरणावर गप्प का?, सुषमा अंधारेंची टीका

चित्रा वाघ चित्रविचित्र बोलतात, संजय राठोड प्रकरणावर गप्प का?, सुषमा अंधारेंची टीका

Subscribe

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीकलीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच महिला अँकरच्या पोशाखाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल चित्रा वाघ यांनी निशाणा साधला होता. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करताना चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांना काहीही मिळालं नाही, भाजप सत्तेत येऊनही त्यांना कुठलंही पद नाही. आमदारकी सुद्धा नाही. त्यामुळे त्या काहीही बोलत असतात. त्या भाजपशी बांधिलकी जपून बोलतात. परंतु चित्रा ताई संजय राठोड प्रकरणावर गप्प का असतात?, असा सवाल सुषाम अंधारे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

गरीब मुलीची अब्रू यांनी चव्हाट्यावर आणली त्यासाठी यांना कोण जाब विचारणार?, या नेहमीच चित्र वचित्र बोलत असतात, त्या फर्स्ट्रेशनमध्ये आहेत. राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध महिलेने व्हिडीओ ट्वीट केला, त्यावरही त्या काही बोलल्या नाहीत, राजकीय रोजगार हमी योजनेवर मजूर बनून काम करत असल्यासारखं हे बोलत असतात, अशी बोचरी टीकाही सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

- Advertisement -

संभाजी भिडे जेव्हा टिकली लावण्यासंदर्भात बोलले तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्यांना जोरदार विरोध दर्शवला, त्यांच्यावर टीका केली. मग त्याच सुप्रिया सुळे जेव्हा महिला पत्रकारांनी साडी नेसली पाहिजे, असं बोलतात, तेव्हा इतर मविआमधील महिला नेत्या का बोलत नाही? आता व्यक्तिस्वातंत्र्य आठवत नाही का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला होता.


हेही वाचा : …तर आदित्य ठाकरेंनी ती गळाभेट घेतली नसती; बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -