घरताज्या घडामोडीराज ठाकरे यांनी भाजपाचे कंत्राट घेतले, सुषमा अंधारेंची टीका

राज ठाकरे यांनी भाजपाचे कंत्राट घेतले, सुषमा अंधारेंची टीका

Subscribe

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट घेणार की ठाकरे गट?, यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादात मनसेने आता उडी घेतली आहे. वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यालाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे हे भाजपाचा अजेंडा चालवत आहेत

- Advertisement -

सुषमा अंधारे पुण्यात बोलत होत्या. राज ठाकरे हे भाजपाचा अजेंडा चालवत आहेत. बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रादेशिक अस्मिता आणि त्यांचा पक्ष संपवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. राजकीय पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबद्दल आपुलकी वाटणे साहजिक आहे. यात आक्षेप वाटण्यासारखे काहीच नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

मी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहे का?

- Advertisement -

एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी लढतो. त्यावेळी त्या कार्यकर्त्याला विधायक मार्गाने नेण्याची जबाबदारी ही त्या नेत्याची असते. राज ठाकरे यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, की मी खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहे का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आता मनसे-भाजप महापालिका निवडणुका एकत्र लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या बँक लॉकरची सीबीआयकडून चौकशी, चार तास उलटले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -