घरमहाराष्ट्र"गृहमंत्री नाही तर वकील म्हणून..." सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत विचारले...

“गृहमंत्री नाही तर वकील म्हणून…” सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत विचारले प्रश्न

Subscribe

सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर एक वकील म्हणून आपल्याला प्रश्न विचारत आहे, आपण मला मार्गदर्शन करावे, असे म्हणत अंधारे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीत टीका केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे (शिंदे गट) छत्रपती संभाजी नगरचे आमदार संजय शिरसाट यांना क्लीन चीट मिळाली आहे. पण या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर एक वकील म्हणून आपल्याला प्रश्न विचारत आहे, आपण मला मार्गदर्शन करावे, असे म्हणत अंधारे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

हेही वाचा – पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास; बावनकुळेंनी बाजू सांभाळून घेण्याचा केला प्रयत्न

- Advertisement -

संजय शिरसाट यांना मिळालेल्या क्लीन चीटबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, औरंगाबादच्या एका आमदाराने सवंग थिल्लर भाषा केली होती . त्यांना मी महत्त्व देत नाही. असभ्य लोकांशी मी बोलत नाही. पण राज्याचे गृहमंत्री अभ्यासू गुणी वकील आहेत. त्यांनी याबाबत एकदा त्यांचे वकिलीचे पत्र दाखवत माहिती देखील दिली आहे. त्यामुळे त्या आमदाराने जी भाषा वापरली त्यामुळे स्त्री लज्जा उत्पन्न होते. तरी गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही न्यायालयाकडेही दाद मागितली. शितल म्हात्रे प्रकरणात लगेच कारवाई होते, आमच्या प्रकरणात कारवाई का नाही?, असा प्रश्न यावेळी अंधारे यांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला.

तर, देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतेय. फडणवीस आपण गृहमंत्री आहात, संजय सिरसाट प्रकरणात जी चौकशी समिती नेमली त्याबद्दल काय माहिती आहे का? काल त्या छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रकरणात त्या आमदाराने मला क्लीन चिट दिलीय असं सांगितलंय. ही क्लीन चीट कशी दिली गेली, याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा. तर या प्रकरणात जी SIT नेमण्यात आली, त्यामध्ये कोण कोण अधिकारी आहेत, याबाबत फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावे, असेही यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

महिलांना ट्रोल करण्यात त्यांना फार मोठी मर्दगिरी वाटते. फडणवीससाहेब तुम्ही त्यांना कायं समज द्याल का? गृहमंत्री म्हणून तुम्हीच उत्तर दिली पाहिजेत. सगळे संजय राऊतांना का घेरत आहेत, सुमार दर्जाचे लोकं त्यांच्याबद्दल बोलतायत. हे योग्य नाही. याला आळा घातला गेला पाहिजे, असेही यावेळी सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आले.

तर यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरही निशाणा साधला. तानाजी सावंतजी नाकाने वांग सोलू नका. हा फक्त ट्रेलर आहे. मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार, असं सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आले. गेली 8- 10 दिवस मी ब्रेक घेतला होता. त्यामुळे या दिवसात काय घडलं ते माहिती नाही. तानाजी सावंतावर नंतर सविस्तर बोलीन. मी असभ्य लोकांशी बोलत नाही, असे म्हणत तानाजी सावंत यांना सुषमा अंधारे यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -