घरमहाराष्ट्रSushma Andhare : लक्षात ठेवा अति तिथे माती असते...; सुषमा अंधारे यांनी...

Sushma Andhare : लक्षात ठेवा अति तिथे माती असते…; सुषमा अंधारे यांनी भाजपाला सुनावले

Subscribe

मुंबई : कोरोना काळातील बॉडी बॅग (शव पिशव्या) खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव समोर आले आहे. मात्र, याच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला फटकारले आहे. त्याअनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या यांनी, अति तिथे माती होते हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजपाला दिला आहे.

हेही वाचा – Bombay High Court : कोविड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणावरून आर्थिक गुन्हे शाखेला न्यायालयाने झापले

- Advertisement -

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू करण्यात आली. ज्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. याच प्रकरणावर काल, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी आर्थिक गुन्हे शाखेला फैलावर घेतले.

- Advertisement -

न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा वेळ मागण्यात आला. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करून चौकशी करत आहात, मग तुम्हाला तपासाचा प्रगती अहवाल सादर करायला काय अडचण आहे? तसेच, जर का तुम्ही आरोप करत आहात, तर त्याचे पुरावे तरी कुठे आहेत? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.

हेही वाचा – Rupali Chakankar : बारामतीतील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत चाकणकरांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या…

याचसंदर्भात सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिलेदारांवर सूडबुद्धीने कारवाया कशा केल्या जातात, त्याचा हा अजून एक ढळढळीत पुरावा आहे. उच्च न्यायालयाने आरोप करणाऱ्यांनाच फटकारले आहे, असे असे सांगतानाच, लक्षात ठेवा अति तिथे माती असते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut: हीच भाजपाची अक्कल; संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -