घरमहाराष्ट्रहजारेंचं लोकपाल आंदोलन एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

हजारेंचं लोकपाल आंदोलन एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

Subscribe

राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित करत टीका केली आहे. अण्णा हजारेंनी सरकार उलथवून टाकण्यासाठीच जनलोकपाल आंदोलन केल्याचा गंभीर आरोप अंधारेंनी केला आहे. तसेच अण्णा हजारेंचे लोकपाल आंदोलन एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं होतं, असा आरोपही अंधारेंनी केला आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. दरम्यान गुरुवारी (३ नोव्हेंबर) चोपडा येथील सभेत सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या. (sushma andhare serious allegations on anna hazare janlokpal andolan and bjp)

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हो, अण्णा हजारेंमुळेच भाजप सत्तेत आली. याबाबत मी शास्त्रशुद्ध मांडणी केली आहे, अण्णा हजारेंनी लोकपालाची मांडणी करताना केलेली मागणी मुळात चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाली नाही.

- Advertisement -

संवैधानिक चौकटीत सत्ता विकेंद्रिकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लोकपाल आंदोलन सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं होतं, अर्थात चौकटीच्या बाहेरचं होतं, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, अण्णा हजारेंच लोकपाल आंदोलन केवळ इथलं सरकार उलथवून लावत, लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी आणि एक लाट तयार करायची यासाठी होतं, लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या गेल्या नाहीत.

- Advertisement -

कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीन विभक्त असले पाहिजे ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांच्या वर लोकपाल बसवला जातो तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो. माणसात निवडकपणा किती असतो, तेच अण्णा हजारे आज एवढे प्रश्न उभे राहत आहेत, पेच निर्माण होत आहेत, त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. असा आरोपही अंधारेंनी केला आहे.


हेही वाचा : संभाजी भिडेंविरोधात महिला पत्रकार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -