निवडणुका कुठल्याही असोत तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची, सुषमा अंधारेंचा टोला

warkari community aggressive against shiv sena sushma andhare

भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाने आपल्या ट्विटरवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरेंनी मोदींची स्तुती केली होती. परंतु रविंद्र जडेजाने हा व्हिडीओ शेअर करत गुजरातच्या नागरिकांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलेलं दिसत आहे. परंतु यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर त्याच्या पत्नीला गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्याने गुजरातच्या नागरिकांना बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत प्रचार करण्याचा प्रयत्न केला, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

मी तो व्हिडीओ बघितला आहे. ज्या पद्धतीने तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आलाय, याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्माने काहीच होत नाही. काही जरी झालं तरी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची गरज लागते. निवडणुका गुजरातच्या असोत किंवा महाराष्ट्राची असो, तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचीच लागते. हा शिवसेनेचा विजय आहे आणि ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांची गुजरातमध्ये हार आहे, असा टोला सुषमा अंधारे लगावला.


हेही वाचा : केडीएमटीच्या बस स्टॉपला फेरीवाल्यांचा