घरताज्या घडामोडीराज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करताना सुषमा अंधारेंनी सांगितली दोन वाघांची गोष्ट

राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करताना सुषमा अंधारेंनी सांगितली दोन वाघांची गोष्ट

Subscribe

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुलुंड येथे झालेल्या महाप्रबोधन यात्रेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे दोन वाघांची गोष्ट सांगत टीका केली. लढाई दोन वाघांमध्ये सुरू असताना कुत्र्यांचा फायदा कशाला हे समजायला हवं, असं सांगत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, २ वाघ होते. ते दोन्ही वाघ शहाणे होते. या दोन्ही वाघांची दोस्तीही प्रचंड होती. लहानपणापासून ते एकत्र होते. सगळ्या गोष्टीत त्यांनी एकमेकांना छान साथ दिली. मात्र, कालांतराने त्या दोघांमध्ये वितुष्ट झाले. अ आणि ब वाघ समजून घ्या. भांडण झाल्यानंतर अ वाघ कसा वाईट आहे, हे ब वाघाने त्याच्या लेकराला सांगितले. एकदा ब वाघ लेकराला शिकार शिकवायला गेला. तेव्हा अ वाघ रस्त्यावर बसलेला दिसला. परंतु ब वाघ तेव्हा खुश झाला. मात्र, अ वाघ आजारी झाला होता. त्यावेळी कुत्र्यांचा एक घोळका तिथे आला. तेव्हा ब वाघाने कोणताही विचार न करता कुत्र्यांवर झेप घेतली.

- Advertisement -

अ वाघाला मदत केल्यानंतर ब च्या लेकराने त्याच्या बापाला विचारलं. तुम्ही त्यांचा एवढा राग करता मग मदत कशाला केली?, ब वाघ शहाणा होता. तो मिमिक्री आर्टिस्ट नव्हता. काहीही झालं तरी ही लढाई २ वाघांमध्ये आहे, त्याचा कुत्र्यांना फायदा व्हायला नको, हे ब वाघाने आपल्या लेकराला सांगितले. परंतु हे कळायला शहाणपण लागतं असं सांगत अंधारेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट एकाच पक्षात निर्माण झाले आहेत. यावेळी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. पण उद्धव ठाकरे गट बाजूला पडला आहे. दरम्यान, राज ठाकरेंची आगामी काळातील भूमिका काय असणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : छत्रपती शिवरायांचा अपमान करत राज्यपाल उघड माथ्याने कसे फिरतायत?, संभाजीराजेंचा संतप्त सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -