घरमहाराष्ट्रगणेश विसर्जनावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची खासदार नवनीत राणांवर टीका, म्हणाल्या...

गणेश विसर्जनावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची खासदार नवनीत राणांवर टीका, म्हणाल्या…

Subscribe

पुणे – राज्यभरात गणरायाचे मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले. खासदार नवनीत राणा यांच्या घरच्या गणपती बाप्पाचेही विसर्जन झाले. मात्र, त्यांच्या विसर्जन करण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. नवनीत राणांचा गणेश विसर्जनाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर त्यांच्यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली.

व्हिडीओत काय –

- Advertisement -

बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या. त्यानंतर त्यांनी मूर्तीला तलावात अक्षरश: फेकून देत विसर्जन केले. ज्या पाण्यात राणांनी बाप्पाचं विसर्जन केले, ते पाणी खूपच अस्वच्छ होते. नवनीत राणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला आहे.

नवनीत राणा आपण वारंवार धर्माच्या नावावर जे अवडंबर माजवत आहात. आता आपल्याला जरा आरसा दाखवण्याची गरज आहे. आम्ही अत्यंत सयंत आणि संयमी भाषेत आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आपल्यासारखे उर बडवून आक्रस्ताळेपणाने बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला धर्म कळत नाही असे अजिबात नाही. असे म्हणत सुषमा अंधांरे यांनी नवनीत राणांना सुनावले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी फरक एवढा आहे की आम्हाला असे वाटते धर्म हा माणसाच्या सौख्यासाठी समृद्धीसाठी आणि त्याची मानसिक उमेद कायम करण्यासाठी असतो. ना की धर्माच्या नावावर माणसाची कोंडी करून त्याचे जगणे मुश्किल करण्यासाठी असतो. नवनीतजी आपण हनुमान चालीसासाठी थयथयाट केला. मात्र, आपल्याला साधी हनुमान चालीसा ही म्हणता येत नाही ? हनुमानाला हनुमान का म्हणतात याचंही नेमके कारण आपल्याला सांगता येत नाही.  काल आपण कहरच केला ज्या पद्धतीने आपण श्रींचे विसर्जन केले. आपल्याला विसर्जनाची पद्धत आणि संस्कार माहीत असू नयेत आणि आपण स्वतःला हिंदू म्हणवता?, अशी टीका त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केली.

एखाद्या धर्माचे काय पद्धतीने पूजाअर्चा केली जाते? त्याला कुठल्या अधिष्ठानमध्ये बसले पाहिजे, बोलले पाहिजे, एवढी गोष्ट आपल्याला कळत नसेल तर आपला उरबडवेपणा काय कामाचा? आपल्याऐवजी काल जर विसर्जनाच्या जागी मुस्लिम आडनावाचा कोणी असता तर कल्पना करा आपण काय गहजब केला असता? त्यामुळे हा बेगडीपणा आता बंद करा, असा टोला अंधारे यांनी लगावला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -