Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव

संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव

Subscribe

मुंबई – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली होती. त्यांचं वक्तव्य आता शिरसाटांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, सुषमा अंधारे यांनी या शिरसाटांविरोधात राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. त्या संजय शिरसाटांविरोधात लवकरच तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर गलिच्छ भाषेत टीका केला होती. “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत”, असं संजय शिरसाट म्हणाले होते. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते. संजय शिरसाटांच्या याच वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. संजय शिरसाटांविरोधात त्या तक्रार दाखल केली आहे. संजय शिरसाटांविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही अंधारे यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.”


महिला आयोगात तक्रार दाखल झाल्यानंतर संजय शिरसाटांनी प्रतिक्रियाही दिली आहे. माझी चौकशी करा. माझ्याकडे आणखी दोन फ्लॅट आहेत, असं त्या म्हणाल्या. मग ते फ्लॅट त्यांनी नावावरून करून घ्यावे. काही महिलांना वाटतं की महिला स्वातंत्र्य या फक्त दोन तीन महिलांनाच आहे. कोणाबद्दल काहीही बोलावं आणि मग त्याची बातमी पसरावी हा स्टंटबाजीचा प्रकार आहे. शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा अंधारेंना माझ्या घरी बोलावून बहिण म्हणून साडी चोळी दिली होती. हे नातं जपणारं आम्ही लोक आहे. मला ती संज्या म्हणते, घोडा म्हणते. संस्कृतिला चांगलं वाटतं का हे? तो वरातीचा घोडा आहे, असंही त्या म्हणाल्या. एकीकडे म्हणते आम्ही लाडाने त्याला संज्या म्हणते. तुझं वय काय, माझं वय काय? वडिलांना तुम्ही असंच बोलता का? असा संतप्त सवालही शिरसाटांनी उपस्थित केला. टीव्ही ९ शी बोलताना ते म्हणाले.

- Advertisement -

अंबादास दानवे पोलिसांत तक्रार करणार

सुषमा अंधारे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. शिरसाट यांचं वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून क्रिमिनल लॉमध्ये बसणारे आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हेही पाहणार आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

- Advertisment -