घरमहाराष्ट्रसंशयित आरोपी गैरहजर, गोविंद पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात

संशयित आरोपी गैरहजर, गोविंद पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात

Subscribe

Govind Pansare Murder Case | कोल्हापूर – गोविंद पानसरे हत्याप्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एस.तांबे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु, संशयित आरोपी गैरहजर राहिल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही.

20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोविंद पानसरे, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा आरोप असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे हा तपास एसआयटीऐवजी एटीएसमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी पानसरे कुटुंबियांनी हायकोर्टाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य करून हायकोर्टाने प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे सोपवला आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणातील संशयित आरोपी कर्नाटकातील गौरी लंकेश यांच्या हत्येतही संशयित असल्याने ते आजच्या सुनावणीला हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली. त्यामुळे आता २१ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवारीराव राणे उपस्थित होते. यावेळी, अॅड. निंबाळकर यांनी समन्स बजावलेले चारही साक्षीदार न्यायालयात हजर असल्याचे सांगितले. त्यामुळे साक्षीपुरावा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, संशयित आरोपी न्यायालयात हजर नसल्याने त्यांच्यासमोरच साक्षीपुरावे सादर करावे अशी विनंती अॅड.पटवर्धन यांनी केली.

- Advertisement -

संशयित आरोपी अमित बदी आणि गणेश मिस्किन यांना मराठी भाषा येत नाही. त्यामुळे कन्नड आणि मराठी भाषेतील दुभाषक आवश्यक असल्याची विनंती अॅड.पटवर्धन यांनी केली.

हेही वाचा – गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आरोपींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; वाचा नेमके प्रकरण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -