घरक्राइमवांद्रे येथून संशयित जिहादी दहशदवाद्याला अटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र एटीएसची संयु्क्त...

वांद्रे येथून संशयित जिहादी दहशदवाद्याला अटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र एटीएसची संयु्क्त कारवाई

Subscribe

मुंबई – बंगाल एटीएसने मुंबई एटीएसच्या मदतीने वांद्रे येथून संशयीत जिहादी दहशदवाद्याला अटक केली. हा संशयित आरोपी एका दहशतावादी संघटनेच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवासांपासून वारंवार दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसने ही कारवाई केली आहे.

पश्चिम बंगाल एटीएसला माहिती मिळाली होती की, एक संशयित जिहादी मुंबईत लपून बसला आहे. त्यानंतर बंगालच्या एटीएसने महाराष्ट्र एटीएससोबत समन्वय साधला. बंगाल एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने वांद्र्यातील निर्मल नगर भागातून सद्दाम हुसैन खान नावाच्या 34 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांनी आणखी एका जिहादीला डायमंड हार्बल येून अट केली आहे. हे दोन्ही संशयित जिहादी आहेत.

- Advertisement -

हशतवादी संघटनेच्या संपर्कात –

अटक करण्यात आलेल्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. हे आरोपी सातत्याने एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते. या प्रकरणी बंगाल पोलिसांचा तपास सुरु आहे. याशिवाय बंगालच्या तपास यंत्रणाही युद्ध पातळीवर तपास करत आहेत. हे संशयित आरोपी कुणाकुणाच्या संपर्कात होते याचा तपास सुरु आहे. आरोपींचा काही घातपात घडवण्याचा कट होता का? याचाही तपास सुरू आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -