घरताज्या घडामोडीसंशयित दहशतवादी सरफराज मेमन पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील कारवाईचा कट उधळला

संशयित दहशतवादी सरफराज मेमन पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील कारवाईचा कट उधळला

Subscribe

पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँगमधून प्रशिक्षण घेऊन आलेला संशयित दहशतवादी सरफराज मेमन याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मुंबईवरील कारवाईचा कट उधळला आहे. मेमन घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने ई-मेलद्वारे दिला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांची झोप उडाली. त्याला अटक करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी मेमनला अटक केली आहे.

इंदूरच्या धाररोड परिसरात राहणारा सरफराज मेमन हा ४१ वर्षांचा असून, त्याच्या पासपोर्टवर २०१८-२०१९ वर्षातील चीनला भेट दिल्याचा शिक्का आहे. त्याच्या पासपोर्टचा अधिक तपशील तपासयंत्रणांकडून गोळा केला जात आहे. सरफराज हा इंदूर येथे असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी त्याला इंदूर येथून अटक केली. त्याची महाराष्ट्र एटीएसचे पथक हे चौकशी करणार आहेत.

- Advertisement -

रविवारी एनआयएला या संदर्भात एक मेल बेनामी ई-मेल आयडीद्वारे आला होता. त्यात या सरफराज मेमनचा उल्लेख करत त्याचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेटचा तपशील जोडण्यात आला होता. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर एनआयएने सर्व तपास यंत्रणांना ही माहिती पाठवली आणि सरफराजला रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मेनन हा मूळचा मुंबईचा आहे. काही दिवसांपूर्वी तो पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगसाठी गेला होता. तो मुंबईत परत आल्यावर त्याचा दहशतवादी हल्ला करण्याचा इरादा होता. यामुळे त्याच्या मागावर तपास यंत्रणा होत्या. अखेर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्यांपासून मुंबईसारख्या शहराचं संरक्षण केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन मुंबईत दाखल, NIAकडून हायअलर्ट जारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -