घरमहाराष्ट्रLokSabha Election : चंद्रपुरात कॉंग्रेसचे कोण? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही...

LokSabha Election : चंद्रपुरात कॉंग्रेसचे कोण? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही इशारा

Subscribe

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सगळेच पक्ष एकदम जोरदार तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची चांगलीच लगबग सुरू आहे. चंद्रपुरातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या इच्छुक आहेत. मात्र, अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील येथून इच्छुक आहेत, त्यामुळे या उमेदवारीचा पेच कायम आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी एकाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून घोळ सुरूच आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार की आमदार प्रतिभा धानोरकर, हेच अद्याप ठरलेले नाही. काँग्रेसचा उमेदवारीचा घोळ सुरू असताना कुणबी समाजाच्यावतीने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात ‘चुकीला माफी नाही’ म्हणून एक पत्रक समाज माध्यमावर व्हायरल केले आहे, तर तेली समाजानेदेखील काँग्रेसने चंद्रपुरातून उमेदवारी दिली नाही तर वेगळी आणि ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यासाठी बुधवार, २० मार्चपासून अधिसूचना लागू करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासही सुरुवात झाली. मात्र, अद्याप या मतदारसंघातील उमेदवार ठरलेले नाहीत. दरम्यान, चंद्रपुरातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या इच्छुक आहेत. मात्र, अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील येथून इच्छुक आहेत, त्यामुळे या उमेदवारीचा पेच कायम आहे. दरम्यान, गुरुवारी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील सात जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. मात्र, यात चंद्रपूर येथील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

काँग्रेसचा उमेदवार ठरेना, पण अंतर्गत धुसफूस बाहेर

महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार, जाहीर सभा, जनसंपर्क सुरू झालेला आहे. महाविकास आघाडीत चंद्रपूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ दिल्ली-मुंबई असा सुरू आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी एकाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास तयार नसतील तर मग प्रतिभा धानोरकर यांना संधी द्या, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा उमेदवारीचा घोळ सुरू असताना कुणबी समाजाच्यावतीने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात ‘चुकीला माफी नाही’ म्हणून एक पत्रक समाज माध्यमावर व्हायरल केले आहे, तर तेली समाजानेदेखील काँग्रेसने चंद्रपुरातून उमेदवारी दिली नाही तर वेगळी आणि ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या बंगल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी न दिल्यास राजीनामा सत्र सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

व्हायरल पत्रात काय?

विजय वडेट्टीवार कुणबी समाजाच्या मतांवर ब्रह्मपुरी तालुक्यातच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राजकारण करत आहेत. विदर्भातील कुणबी समाज त्यांच्या मागे उभा राहिला. केवळ राजकारण आणि चळवळीतच नाही तर नेहमीच कुणबी समाजाने वडेट्टीवार यांना पाठिंबा दिला आहे. पण गेल्या काही महिन्यात याच कुणबी समाजातील एका विधवा महिला लोकप्रतिनिधीच्या हक्काच्या जागेवर वडेट्टीवार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्यांना राजकारण कळत नसेल पण निती नियम कळतात. राजकारणातील डावपेच समजत नसतील मात्र, नियत कळते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय, हक्काच्या जागेवर पोळी भाजली तर चुकीला माफी नाही, असा इशाराच या पत्रातून विजय वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

असा असेल निवडणूक कार्यक्रम?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना निघणार असून बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजपकडून नागपुरातून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे. रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय झालेला नाही. तर महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील सगळेच उमेदवार सध्या प्रतीक्षेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -