Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : नवऱ्याचा पराभव झाल्यानंतर स्वरा भास्करने आयोगाला विचारले...

Maharashtra Election Results 2024 : नवऱ्याचा पराभव झाल्यानंतर स्वरा भास्करने आयोगाला विचारले प्रश्न

Subscribe

आज निवडणूक निकाल समोर आल्यानंतर फहाद अहमद यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फहाद अहमद यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत.

मुंबई : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सना मलिक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार फहाद अहमद यांच्यात मुख्य लढत होती. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. आज निवडणूक निकाल समोर आल्यानंतर फहाद अहमद यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फहाद अहमद यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. (Swara Bhaskar questions Election Commission after Fahad Ahmed defeat from Anushakti Nagar Assembly constituency)

आज सकाळपासून निकाल समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या पार पडल्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सना मलिक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार फहाद अहमद यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अंतिम म्हणजे 19 व्या फेरीअखेर सना मलिक यांनी 3378 इतकी मते घेऊन विजय मिळवाल. सना मलिक यांना या मतदारसंघातून 49 हजार 341 मते मिळाली आहेत. याशिवाय फहाद अहमद यांना 45 हजार 963 आणि मनसेचे नवीन आचार्य यांना 28 हजार 362 आणि वंचित बहुजन आघाडीचे सतीश वामन यांना 10 हजार 514 मते मिळाली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : आम्ही आधुनिक अभिमन्यूच, चक्रव्यूह तोडला; फडणवीसांचा निशाणा

- Advertisement -

फहाद महमद यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वरा भास्कर यांनी ट्वीट करताना म्हटले की, दिवसभर मतदान होत असतानाही ईव्हीएम मशीन 99 टक्के चार्ज कसे असू शकते? याचे निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. तसेच ECISVEEP आणि SpokespersonECI ला टॅग करून त्यांनी दावा केला की, अणुशक्तीनगर विधानसभेत 99 टक्के चार्ज मशीन उघडल्याबरोबर, भाजपाने पाठिंबा दिलेल्या अजित पवार गटाच्या उमेदवाराला मते कशी मिळू लागली? असा प्रश्नही स्वरा भास्कर यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Balasaheb Thorat : काँग्रेसचा CMपदाचा चेहरा पडला, थोरातांचा पराभव करत अमोल खताळ ठरले जायंट किलर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -