Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र वीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार; राज्यपाल रमेश बैस यांची घोषणा

वीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार; राज्यपाल रमेश बैस यांची घोषणा

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला हवं. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. ने मजस ने परत मातृभूमीला आणि जयोस्तुते जयोस्तुते या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे, असं विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला हवं. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. ने मजस ने परत मातृभूमीला आणि जयोस्तुते जयोस्तुते या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे, असं विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. येत्या 28 मे रोजी सावकरांची 140 वी जयंती आहे. हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, अशी माहितीही राज्यपाल बैस यांनी दिली.(  SwatantraVeer Savarkars poems will be included in the syllabus Announcement of Governor Ramesh Bais )

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 22 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण पार पडले. यावर्षीचा शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार व स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना देण्यात आला. हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी हे विधान केलं.

- Advertisement -

यावेळी राज्यपाल बैस यांनी कॉंग्रेसचं नाव न घेता काँग्रेसवर टीका केली. सावरकर एक उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं वर्णन आपल्या पुस्ताकतून अधोरोखित केलं आहे. मधल्या काळात अनेक क्रांतीकारकांबद्दल एक नॅरेटिव्ह तयार केला गेला. या क्रातीकारकांना बदनाम केलं गेलं. सावरकरांना नाकारणं म्हणजे सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांचं बलिदान नाकारणं आहे, असं रमेश बैस म्हणाले.

( हेही वाचा: BMC election : मोदींना तळ ठोकून बसायला सांगा; राऊतांचा खोचक टोला )

सावरकर हे व्यक्ती नाही, विचार

- Advertisement -

सावरकर यांचं कार्य महान आहे. त्यांचे विचार उत्तुंग होते. सावरकर फक्त व्यक्ती नाही तर विचार आहेत. आपण सावरकरांचे अनेक प्रकारे वर्णन करु शकतो. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान प्रचंड मोठं आहे. काही वेळा त्यांच्याविषयी विरोधात लिहिले गेलं आहे. पण ते सगळं विसरुन या ठिकाणी त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत. त्यासाठी यांच्या विचारांचा प्रचार केले पाहिजे, असं आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केलं.

- Advertisment -