पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची तीन दिवसींय बैठक आजपासून पुण्यात सुरु होणार आहे. आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राम मंदिर, सामाजिक समरसता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणावरही चर्चा होणार आहे. या बैठकीत 36 संघप्रणित संस्थांचे 266 अधिकारी सहभागी होणार आहेत. संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat), संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.(Swayamsevak Sanghs meeting in Pune will decide the direction of Lok Sabha 266 officials from all over the country will be present)
या बैठकीच्या संदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, गेल्या वर्षी रायपूर येथे झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयांच्या आधारे विविध संघटनांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत संघटना आपला भविष्यातील कृती आराखडाही मांडणार आहेत. राम मंदिराबाबत विहिंप, भविष्यातील योजना मांडणार आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाही अनुभव शेअर करणार असून, भविष्यातील कृती योजना मांडणार आहेत.
हेही वाचा : उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर जरांगे पाटील आक्रमक
नोव्हेंबरमध्ये ठरवली जाणार लोकसभेबाबत रणनिती
आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुजरातमधील भुज येथे होणाऱ्या आरएसएसच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बैठकीत मांडलेल्या विचारांवर चर्चा करून भविष्यातील कृती आराखडा तयार केला जाईल. या बैठकीत संघ आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीतीही निश्चित करणार आहे. संमेलन दरवर्षी होते. यामध्ये सर्व संस्था त्यांच्या क्षेत्रातील अनुभव कथन करून भविष्यातील कृती योजना मांडतात. या क्रमाने देशातील सद्य परिस्थितीवरही चर्चा केली आहे. आम्ही देश आणि समाजाशी संबंधित सर्व समस्यांवर चर्चा करतो आणि त्याच्याशी संबंधित कृती आराखडा तयार करतो अशी माहिती आंबेकर यांनी दिली.
हेही वाचा : भोपाळमध्ये INDIA आघाडीची ऑक्टोबरमध्ये पहिली जाहीर सभा; आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
संघाचा सामाजिक एकोपा प्रस्थापित करण्यावर भर
गेल्या काही वर्षांपासून संघ जातीभेद संपवून सामाजिक एकोपा प्रस्थापित करण्यावर भर देत आहे. या क्रमाने अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये एक गाव, एक विहीर, एक स्मशानभूमी अभियान सुरू करण्यात आले. याशिवाय अनेक निर्णयही घेण्यात आले. या मोहिमांच्या निष्कर्षांवर समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय भारतीय मूल्यांवर आधारित महिला सक्षमीकरणाच्या पर्यायांवर चर्चा केली जाणार असल्याचीही माहिती आंबेकर यांनी दिली.