घरमहाराष्ट्रविठूरायाला देखील वाजते थंडी! बरं का?

विठूरायाला देखील वाजते थंडी! बरं का?

Subscribe

थंडीपासून बचाव करण्यासाठी विठ्ठल - रखुमाईला उबदार कपडे घातले जात आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी देवाला उबदार रजई, शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचा जोर पाहायाला मिळत आहे. आता ही थंडी आता विठ्ठल – रखुमाईला देखील वाजू लागली आहे. आता या थंडीपासून बचाव करण्यासाठी विठ्ठल – रखुमाईला उबदार कपडे घातले जात आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी देवाला उबदार रजई, शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे प्रक्षाळपुजेनंतर देवाला उबदार कपडे घातले जात आहेत. रात्री शेजारतीनंतर विठुराया झोपण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढला जातो. त्यानंतर देवाचं अंग फुसले जाते. त्यानंतर देवाच्या डोक्यावरील मुकूट काढून १५० फुट लांबीचे उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर बांधण्यात येते. यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून सुती उपरण्याची कानपट्टी देवाच्या कानाला बांधली जाते. शिवाय, देवाच्या अंगावर उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात येतो. यावेळी देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली  देखील घेतली जाते. हे सर्व झाल्यानंतर  देवाला तुळशीहार घालून आरती करुन देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते. त्यानंतर पहाटे देवाला काकड आरतीसाठी तयार केले जाते. होळीपर्यंत हा दिनक्रम सुरू असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -