घरCORONA UPDATEतबलिगी जमातमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले, केंद्र सरकारचा धक्कादायक दावा

तबलिगी जमातमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले, केंद्र सरकारचा धक्कादायक दावा

Subscribe

तबलिगी जमातच्या १८०० जणांना ९ हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

आजपर्यंत देशात ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १६३७ संक्रमित रुग्नांची संख्या झाली आहे. मंगळवारपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत त्यामागे नवी दिल्लीतील तबलिघी जमात कारणीभूत आहे, असा धक्कादायक दावा आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद केला. तबलिगी जमातच्या १८०० जणांना ९ हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. म्हणून आताच वाढलेली कोरोनाची प्रकरणे हि संपूर्ण देशाचा ट्रेंड दर्शवत नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने कोरोनासंबंधी चुकीची माहिती देणाऱ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यासाठी आम्ही technicalquery.covid19@gov.in हा ई-मेल आय डी बनवला आहे. त्यामाध्यमातून आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव आणि एम्सचे विशेष डॉक्टर हे माहितीची आदान प्रदान करणार आहेत, असे अग्रवाल म्हणाले. रेल्वे प्रशासन २० हजार डबे बदलून ३.२ लाख विलगीकरण आणि क्वारंटाईन बेड बनवण्याची तयारी करीत आहे. ५ हजार कोचमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. टेस्ट किट, औषधे आणि मास्क यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी विमान  उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) रमन गंगा केतकर म्हणाले की, आम्ही आत्तापर्यंत, ४७ हजार ९५१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आयसीएमआर नेटवर्कमध्ये १२६  लॅब आहेत, त्यापैकी ५१ खाजगी लॅब मंजूर करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाले की, देशभर जे श्रमिक अडकलेले आहेत त्या सर्वांसाठी सर्व राज्यांनी अन्न व निवाराची व्यवस्था केली आहे, त्यासाठी २१,४८६ मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून ६ लाख ७५ हजार १33 लोकांना आश्रय देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -