घर महाराष्ट्र Tadoba Online Booking Scam: ताडोबातील ऑनलाइन बुकिंगचा मार्ग मोकळा; ठाकूर बंधूंना झटका

Tadoba Online Booking Scam: ताडोबातील ऑनलाइन बुकिंगचा मार्ग मोकळा; ठाकूर बंधूंना झटका

Subscribe

चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी ही स्थगिती उठवत ताडोबाला सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली. या निर्णयामुळे चिंतेत सापडलेल्या ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरू होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर: ताडोबा प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंगचे कंत्राट वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या एजन्सीला दिलं होतं. वर्ष 2021 ते 23 चे ऑडिट झाल्यानं त्यामध्ये तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपयांची तफावत आढळली, याबाबत एजन्सीला पैसे भरण्यास सांगितले असता त्यांनी 10 कोटी रुपये ताडोबा प्रशासनाकडे भरले मात्र उर्वरित 12 कोटी रुपये त्यांनी भरले नाही, नेहमी शासनाला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने बुकिंग एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर व रोहित विनोद कुमार ठाकूर या दोघांवर वन अधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा रामनगर पोलीस स्थानकात दाखल केला होता. आता यावर न्यायालयाने ठाकूर बंधूंना झटका दिला आहे. आगामी काळातील दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा मार्ग आता न्यायालयाने मोकळा केला आहे. (Tadoba Online Booking Scam Online Booking Scam in Tadoba A shock to the Thakur brothers)

चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी ही स्थगिती उठवत ताडोबाला सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली. या निर्णयामुळे चिंतेत सापडलेल्या ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरू होण्याची शक्यता आहे.

न्यायालय काय म्हणालं?

- Advertisement -

कारारानुसार, जी रक्कम कंपनीनं द्यायला हवी होती. त्या पद्धतीने ती दिली गेली असल्यानं, हीच बुकिंग पद्धती रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ठाकूर बंधू यांनी हे संकेतस्थळ बंद होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. याच संकेतस्थळावरून ताडोबाचे ऑनलाइन बुकिंग व्हावी यावर ठाकूर बंधू अडून होते. मात्र,उच्च न्यायालयानं जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निर्णयाला स्थगिती दिली होती. ताडोबा व्यवस्थापन आणि भूमिगत असलेले ठाकूर बंधू यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. आज जिल्हा सत्र न्यायालयाने यावर ताडोबा व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल देत ठाकूर यांची बाजू फेटाळून लावली. ऑनलाइन बुकिंग आता शासकीय प्रणाली अंतर्गत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

(हेही वाचा: INDIA आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष, समन्वयक पदाबाबत होणार निर्णय )

- Advertisement -

 

- Advertisment -