Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र देशात ताई, राज्यात दादा..? छगन भुजबळांनी केले सूचक वक्तव्य

देशात ताई, राज्यात दादा..? छगन भुजबळांनी केले सूचक वक्तव्य

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता देशात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार हे चित्र बऱ्यापैकी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांचा उत्तराधिकारी कोण? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पवार यांच्या या निर्णयाबाबत पक्षाच्या बड्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत नाराजी व्यक्त केली आहे. पण ही पवारांची राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण शरद पवार हे पक्षाची धुरा त्यांच्या लेकीकडे म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांनी पक्षाची धुरा कोणाकडेही दिली तरी नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच काम करणार, असे अजित पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. पण राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता देशात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार हे चित्र बऱ्यापैकी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या अध्यक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुप्रिया सुळे लोकसभा खासदार असल्याने त्यांना देशाची धुरा सांभाळण्यासाठी देण्यात येऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – आता ‘वज्रमूठ’ सभा होणार नाही? नाना पटोलेंचं मोठं विधान

याबाबत बोलताना छगन भूजबळ म्हणाले की, “साधारणपणे पक्षाचा राज्यातल्या कारभार अजितदादा बघतात आणि दिल्लीतलं पक्षाचं काम संसदेचं काम सुप्रियाताई योग्य पद्धतीने सांभाळतात. सुप्रिया ताईंना प्रश्नांची जाण आहे. त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. ”

- Advertisement -

तसेच, “शरद पवार यांनी राजीनामा देणे हा सर्वांसाठीच मोठा धक्का आहे. आम्ही सर्वजण शरद पवारांवर प्रेम करणारे लोक आहोत. ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांची जाण असल्याने आम्ही शरद पवारांचा हात धरला. शिवसेनेतून आलो आणि त्यानंतर राजकारणात त्यांचा हात धरून पुढची वाटचाल सुरू केली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचे नाव मिळाले. देशातील प्रश्नांची जाण असणारे ते कदाचित एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांनी अचानक असा निर्णय घेणं धक्कादायक होतं.” असे मत देखील छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादीतील “महानाट्य”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंक पाटील यांना देखील यावेळी अश्रू अनावर झाले तर जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील या सर्वांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली. पण शरद पवार हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -