घरमहाराष्ट्रताईंचं पंचांग 'हेरंब' लिहितात, सुप्रिया सुळेंना आशिष शेलारांचे कवितेतूनच उत्तर

ताईंचं पंचांग ‘हेरंब’ लिहितात, सुप्रिया सुळेंना आशिष शेलारांचे कवितेतूनच उत्तर

Subscribe

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, पत्रकारांची काळजी घेण्याच्या दिलेल्या कानमंत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपामध्ये ट्विटर वॉर रंगले आहे. सुप्रिया सुळे यांनी समाजसेवक आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांची ‘चला, आपण धाब्यावर जाऊ…’ ही कविता शेअर करत भाजपाला कोपरखळी दिली आहे. तर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी त्यांना कवितेतूनच उत्तर दिले आहे.

हेही वाचा – BJP मुळे ईशान्यकडील राज्य युद्धाचे रणांगण बनले; काँग्रेसचा हल्लाबोल

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याचअनुषंगाने भाजपाने कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी अहमदनगर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पत्रकारांबद्दल दिलेल्या ‘कानमंत्रा’ची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथील पत्रकारांची यादी तयार करा, महाविजय 2024पर्यंत आपल्याविरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. या पत्रकारांना महिन्यातून धाब्यावर न्या, एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल, असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

- Advertisement -

त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. त्यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. त्यावर आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की,

चला मटण खाऊन देवदर्शनाला!

कार्यकर्ते साहेबांना म्हणाले,
आमच्या गणपतीच्या दर्शनाला या,
सुप्रियाताईंना पण आमचे आमंत्रण द्या
साहेब म्हणाले, मी नाही येऊ शकणार, मटण खाऊन कसं देवदर्शन करणार!

ताईंचं पंचांग “हेरंब” लिहितात,
मटण खाऊन सॅनिटायझर लावून ताई खुशाल देवदर्शन करतात
ताई खुशाल महाराष्ट्राच्या प्रथा-परंपरा अशा ‘धाब्यावर’ बसवतात
पुरोगामी, पुरोगामी असा जप मात्र न चुकता करतात
आणि बरं का?
डावी बाजू सांगायला पण ताईंना एखादे “कुलकर्णी”च हवे असतात!

फुले-शाहू आंबेडकर या महामानवांची उठता-बसता साहेब आणि ताई आठवण करत राहतात
छत्रपतींना मात्र सोईस्कर विसरतात
साताऱ्यात उदयनराजेंना हरवणार,
शिर्डीत रामदास आठवलेंना पाडणार,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणाऱ्या काँग्रेससोबत आयुष्यभर राहणार,
कधी अडचणी वाढल्याच की,
मग मात्र कोल्हापूरची गादी आठवणार!

नागपूरचे सावजी खाताना कुणी ‘गोवारीं’बद्दल विचारले…
कोल्हापूरात तांबडा- पांढरा पिताना ‘दाऊद’बद्दल कुणी छेडले
किंवा
मुंबईत मालवणी मटण खातान कुणी ‘भूखंडांच्या श्रीखंडा’वरून प्रश्न केले
तर…
ताई हसत-हसत एक ‘सेल्फी’ काढतात
‘मटण’ खातांना आता ‘श्रीखंड’ कशाला?
असा विनोद करtन स्वत:च हसत बसतात!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -