घरट्रेंडिंगजेव्हा ताज महाल सुट्टीवर जातो

जेव्हा ताज महाल सुट्टीवर जातो

Subscribe

अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच ताज महाल इतक्या कालावधीसाठी बंद राहणार आहे

ताज महाल कधीही सुट्टीवर जात नाही. पण अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी ताज महालाचा प्रवेश सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. एरव्ही ताज महाल हा देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी काही तासांसाठी बंद असतो. पण सतत दोन दिवस ताज महाल सर्वसामान्यांना बंद करण्याचा निर्णय सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे तोदेखील एका विशेष कारणासाठी.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने ताज महाल दोन दिवस सर्वसामान्यांना भेटीसाठी बंद राहील. सुरक्षिततेच्या कारणामुळे ताजमहाल बंद राहणार आहे असे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिक्षक वसंत कुमार स्वर्णकार यांनी जाहीर केले आहे. उद्या २४ तारखेपासून दुपारी १२ वाजल्यापासून ताजमहाल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत हा ताजमहाल बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

ताजमहाल परिसरातील सर्व घरे, दुकाने, रेस्टॉरन्ट्स आणि हॉटेल्सही या काळात बंद करण्यात येणार आहेत. ज्याठिकाणी ट्रम्प यांच्या दौऱ्याचा कालावधी आहे अशा सर्व दुकानांची पडताळणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेच ही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांकडून आधार कार्डची मागणीही केली आहे. पण हा पडताळणी प्रकियेचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहास्तव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मुंबई दौरा करणार आहेत.

अहमदाबादमध्येही तयारी

डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यासाठी येणार आहेत. या निमित्ताने अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी देखील कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून २०० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या निमित्ताने अहमदाबादच्या रस्त्यावर नमस्ते ट्रम्पचे पोस्टर दिसत आहेत. तसेच मोठ-मोठ्या बॅनर सोबतच अनेक ठिकाणी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे पेंटिंग्ज दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -