घरताज्या घडामोडी'आधी अजित पवारांवर कारवाई करा'

‘आधी अजित पवारांवर कारवाई करा’

Subscribe

'आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांचे निलंबन करा', असे म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले पण भाजपासाठी कार्यरत असणारे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर भाजपासाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपीत सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पण, या निलंबनानंतर मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. ‘आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांचे निलंबन करा’, असे म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

अजित पवारांना निलंबित करा

राज्याच्या सत्ताकारणात पक्षविरोधी भूमिका घेत अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली होती? तसेच अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळीही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली का?, असे एक ना अनेक सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहे.

- Advertisement -

झेडपीत ६ सदस्यांचे निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले पण भाजपासाठी कार्यरत असणारे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपसाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या विरोधात मतदान करणाऱ्या सहा सदस्यांना पक्षाने निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या सदस्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील मंगल किरण वाघमोडे (रा. संग्रामनगर), शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील (रा. अकलूज), सुनंदा बाळासाहेब फुले (रा. यशवंतनगर), अरुण बबन तोडकर (रा. म्हाळुंग), स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (रा. बोरगाव), गणेश महादेव पाटील (रा. पिलीव) यांचा समावेश आहे.


हेही वाचा – मोहिते पाटलांना राष्ट्रवादीचा दणका; झेडपीत ६ सदस्यांचे निलंबन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -