घरCORONA UPDATEव्हायरल व्हिडिओ : तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा - उदयनराजे भोसले

व्हायरल व्हिडिओ : तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा – उदयनराजे भोसले

Subscribe

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा निषेध केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नर मधील बड्या राजकीय नेत्यावर मारहाणीचा आरोप केला आहे, असा दावा या तरुणाने केला आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा निषेध केला आहे.

अक्षय बोऱ्हाडे असे या तरुणाने नाव आहे. या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं आणि त्यांना न्याय देण्याचं काम केलं. कधीही स्वतःचा विचार केला नाही. माझं कुटुंब देखील माझ्यासोबत काम करत. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असतील तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, असे या तरुणाने सांगितले.

- Advertisement -

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य…

Chhatrapati Udayanraje Bhonsle ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮೇ 27, 2020

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याची दखल घेतली. याबाबत उदयनराजे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे की, जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. स्वतःच आयुष्य सेवा करण्यात वाहून घेण्याचं काम या तरुणाने केले आहे. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

- Advertisement -

पोलीस प्रशासनाला आवाहन करताना उदयनराजे म्हणाले की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करा आणि गुन्हा दाखल करून या युवकास न्याय मिळवून द्यावा. सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव प्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलित करणारे असतील, असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -