घरमहाराष्ट्रअकाउण्ट सांभाळा, बनावट ‘गूगल पे’, ‘फोन पे’द्वारे यूजर्सची लूट

अकाउण्ट सांभाळा, बनावट ‘गूगल पे’, ‘फोन पे’द्वारे यूजर्सची लूट

Subscribe

लिंकवर क्लिक करताच खात्यातून होताहेेत हजारो रुपये गायब

देशभर लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन खरेदीसाठी गूगल पे व फोन पे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मात्र, गूगल पे, पेटीएम, फोन पेच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. हॅकर्स सोशल मीडियाचा गैरवापर करत असून, ऑनलाईन बँकिंग किंवा पेमेंट अ‍ॅपचे गूगल पे व फोन पे बनावट पेज तयार करत आहेत. याद्वारे बनावट जाहिरात करत बक्षीस मिळाल्याचे इंटरनेट वापरकर्त्या यूजर्सला भासवले जात आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर कुपन स्क्रॅॅच करण्यास यूजर्सला सांगितले जाते. त्यानंतर ५०० ते २ हजार मिळाल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात लिंकवर क्लिक करताच यूजर्सच्या बँक खात्यातील पैसे गायब होत आहेत. त्यामुळे हॅकर्सपासून सावध आणि सुरक्षित राहणे गरजेचे आहे, असे आवाहन दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

हॅकर्सने गूगल पे व फोन पेच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज तयार केले आहे. त्यात इंटरनेट वापरकर्त्या यूजर्सला हजारो रुपयांचे स्क्रॅच कूपन लागले आहे, असे भासवून हॅकर्सने पेड जाहिरात बनावट पेजवर लावली आहे. यूजर्सला मोबाईलवर संबंधित जाहिरात दिसल्यास ती बनावट आहे, हे लक्षात आले नाही तर अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अनेकांकडून या लिंकवर क्लिक केले जात आहे. त्यामुळे अनेक यूजर्स हॅकर्सच्या जाळ्यात अडकत आहेत. बनावट वेबसाईटवरील कूपन स्क्रॅच केले तर हजारो रुपये मिळणार आहे, असे भासवले जाते. पैसे मिळवण्यासाठी क्लेम करा, त्यासाठी क्लिंक करण्यास सांगितले जाते. क्लिक करताच गूगल पे किंवा फोन पे अ‍ॅप उघडते. त्यातून लगेचच हॅकरच्या अकाऊंटला थेट ५०० ते २ हजार रुपये जातात. तसे हॅकर्सकडून लिंकवर सेटिंग केले गेले आहे.

- Advertisement -

दृष्टीक्षेपात

  • बनावट लिंकच्या माध्यमातून हॅकर्सकडून फसवणूक
  • बक्षिसाच्या आमिषांना बळू पडू नका
  • बनावट लिंक असतील तर मोबाईलमधून तत्काळ करा डिलीट.

लिंकवर क्लिक करू नये

हॅकरने तयार केलेल्या लिंकवर इंटरनेट वापरकर्त्यांनी क्लिक करू नये. सायबर भामट्यांनी डिजिटल मार्केटिंगचा गैरवापर करून सर्वसामान्यांना फसवले जात आहे. लिंकवर क्लिक केल्यास २ हजार रुपये थेट हॅकरच्या अकाऊंटमध्ये जात आहेत. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक न करता सावधानता बाळगावी. – तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -