Homeमहाराष्ट्रAthawale on Accident : अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाय करा; केंद्रीय...

Athawale on Accident : अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाय करा; केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांची मागणी

Subscribe

कुर्ला - एलबीएस रोड येथे बेस्ट बसने वाहनांना आणि नागरिकांना धडक देऊन चिरडल्याची दुर्घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबई : कुर्ला – एलबीएस रोड येथे बेस्ट बसने वाहनांना आणि नागरिकांना धडक देऊन चिरडल्याची दुर्घटना सोमवारी रात्री घडली. ही घटना मुंबईकरांसाठी चिंताजनक असून धोक्याची घंटा आहे. या अपघातात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच, अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, या अपघातातील मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी सुद्धा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (take measures to prevent recurrence of accidents; union minister of state ramdas athawale’s demand)

रस्त्यावर कुठेही बेस्ट, एस टी, खासगी बस चालक, अवजड वाहन चालक हे भरधाव वेगाने चालवतात. त्यामुळे अपघात होतात. त्यामध्ये जीवित तसेच वित्तीय हानी होते. वाहनांचे नुकसान होते. अनेकदा वाहन चालकांमध्ये स्पर्धा, चढाओढ लागते. त्यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. अनेकदा वाहन चालकांचे शुल्लक कारणावरून भांडणे होतात. त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. ते जीवावर बेतते. त्यामुळे राज्य शासनाने आणि एस.टी. महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि वाहतूक विभाग पोलीस यांनी बेदरकार वाहने चालविणार्‍या वाहन चालकांना नियंत्रणात ठेवावे. त्यांना आवर घालावा. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

हेही वाचा – Kurla Bus Accident : बेस्ट अपघातातील चालकाला पोलीस कोठडी; ईव्ही चालविण्याचा अनुभव नसल्याचे उघडकीस

सोमवारी रात्री पावणेदहा वाजता 332 क्रमांकाच्या कुर्ला-अंधेरीदरम्यान धावणार्‍या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरुन जाणार्‍या तसेच पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. यावेळी बसने अनेकांना चिरडले. या अपघातात सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. जखमींपैकी 18 जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले तर इतर 22 जखमींवर अद्याप भाभा, सायन, हबीब, कुर्ला नर्सिंग होम, कोहीनूर क्रिटीकेअर आणि सेव्हन हिलमध्ये उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. संबंधित चारही पोलीस कर्मचारी तिथे बंदोबस्तावर हजर होते. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातातील आरोपी संजय मोरे याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – Best Bus Acident : भाडे तत्वावरील बसगाड्यांबाबत पुनर्विचार करा; भाजपाची बेस्टकडे मागणी


Edited by : Ashwini A. Bhatavdekar