घरमहाराष्ट्रज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते... ; जरांगे पाटील यांची समाजातील विरोधकांवर...

ज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते… ; जरांगे पाटील यांची समाजातील विरोधकांवर टीकास्त्र

Subscribe

सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं. दुसरं उपोषण मागे घेतला आणि त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटल दिला आहे. तोपर्यंत जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करत लोकांशी संवाद साधत आहेत, सभा घेत आहेत. मराठा समजाला आरक्षण देण्यावरून मराठा समाजामध्येच अंतर्गत वाद सुरू असल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी (ता.18 नोव्हेंबर) सातारा येथे सभा पार पडली. मात्र या सभेलाच मराठा समाजातील काही आंदोलकांनी विरोध केला.

 

- Advertisement -

हेही वाचा… उदयनराजे भोसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले; “मराठे आरक्षण मिळणार”

मराठा समाजाला जर आरक्षण हवे असेल तर मराठ्यांना कुणबी हा शब्द धारण केला पाहिज. जर कोणाला कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटत असेल तर त्यांना आरक्षण मिळणारच नाही. पण त्यांनी शेती पण करू नये, अशा शब्दात जरांगे पाटील या मराठा समाजतील विरोधकांवर टीका केली आहे.

- Advertisement -

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पटील यांची मागणी आहे. मात्र जरांगे पटील यांच्या मागणीला मराठा समाजाच विरोध करत या मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे समाजाची मराठा ही असलेली ओळख पुसण्याचा डाव असल्याचं आरोप देखील केला होता.

हेही वाचा… कल्याण पूर्वेत 20 नोव्हेंबरला जरांगे पाटील यांची जाहीर सभा

मराठा समाजातील विरोधकांनी केलेल्या टिकेला जरांगे यांनी टीका केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, की शेती करणारे हे कुणबी असतात तर लढाई करणारे मराठे असतात. सध्याचे लोक लढाई करत आहेत की शेती ते सांगावे. शेती करूनही ज्यांनी कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते त्यांना आरक्षण मिळणार नाहीत. त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे.

समाजातील मोठा वर्ग जगण्याची आता जगण्याची लढाई लढत आहे. त्याला या असल्या अभिमामापेक्षाही कुणबी हा शब्द धारण करत आरक्षण मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मराठा शब्दावर ठाम राहायचे त्यांनी राहावे. पण आम्हाला आरक्षण हवे असल्याने आम्ही कुणबी शब्द धारण करणार आहोत, असं जरांगे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -