घरताज्या घडामोडीTaliban : तालिबानशी जवळीक पाकिस्तानला ठरतेय घातक, जिहादवरुन उफाळली हिंसा

Taliban : तालिबानशी जवळीक पाकिस्तानला ठरतेय घातक, जिहादवरुन उफाळली हिंसा

Subscribe

अफगानिस्तानवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला रसद आणि मैत्रीचा हात दिला असल्याच्या चर्चा आहेत. तालिबानने सरकार स्थापन केल्यानंतरही पाकिस्तानकडून मैत्री असल्याचे कबूल करण्यात आले आहे. पाकिस्तानी सेना, आईएसआई आणि राजकीय नेत्यांचीही तालिबान्यांशी जवळीक आहे. परंतु आता हीच जवळीक पाकिस्तानला घातक आणि डोकेदुखी ठरत आहे. पाकिस्तानमध्ये धार्मिक, जातीय आणि जिहादी मुद्द्यावर प्रचंड हिंसाचारा उफाळत आहे. पाकिस्तानमध्ये शरिया लागू करण्यावर पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि तालिबान जोर देत असल्यामुळे हिंसाचार आणि जाळपोळच्या घटना घडत आहेत.

तालिबान्यांनी अफगानिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये आतंकवाद आणि धार्मिक हिंसेत वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या सरकारने तालिबानला अफगानिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली होती. पाकिस्तानला तालिबानशी असलेल्या मैत्रीची मोठी किंमत चुकती करावी लागत आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आपला सह्योगी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानसह जुळवून घेण्यास तयार नाही. कट्टरपंथी देवबंदी विचारसरणी असलेल्या टीटीपीला पाकिस्तानमध्ये शरिया लागू करायचा आहे. तसेच कट्टरपंथी बरेलवी विचारसरणीच्या तहरीक-ए- लब्बैक पाकिस्तान हे पाकिस्तानमध्ये शरिया शासन लागू करण्यासाठी टीटीपीची विरोधी आहे.

तालिबान-पाकच्या मैत्रीत अल्पसंख्यांकांचा बळी

पाकिस्तानमध्ये देवबंदी आणि बरेलवी कट्टरपथीयांच्या लढाईचा परिणाम अल्पसंख्यांकांवर अधिक होत आहे. दोन्ही कट्टरपंथी अल्पसंख्यांना निशाणा बनवत आहेत. पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार मागील काही वर्षांमध्ये खूनाच्या, अपरहण, धार्मिक हल्ले, जातीय हल्ले, हिंसाचार, जबरदस्ती धर्मांतर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मागील १० वर्षांच्या काळात पाकिस्तानमध्ये ईसाईंच्या विरोधात ३०४ घटना घडल्या आहेत. तर हिंदूंविरोधात २०५ हिंसेच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

काबूलमध्ये बॉम्ब हल्ला

काबूलमध्ये एका लष्करी रुग्णालयात बॉम्ब हल्ला आणि गोळीबार कऱण्यात आला आहे. या हल्ल्यात जवळपास १९ लोकांचा मृत्यू झाला असून एकूण ५० लोक गंभीर जखमी झाले आहेत. काबूलमधील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा :  पंजाबमध्ये काँग्रेसला जोर का झटका,माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, स्वपक्षाची स्थापना


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -