मुंबई : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी माणसासाठी राज-उद्धव यांनी एकत्र यावे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे. भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गंभीर्याने पावलं टाकावी लागतील, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले की, जर त्यांनी साद घातल्यास राज ठाकरे निर्णय घेतील. (Talks of Thackeray brothers coming together revived after crushing defeat in assembly elections)
महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बहुतांश ठिकाणी राज ठाकरे यांच्याकडूनही उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यामुळे मतविभागणीचा फटका मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना बसला. यामुळे आता मराठी माणसाची मते विभागू नयेत, यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असा पर्याय समोर आणला जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी ज्या राजकीय पक्षांना मराठी माणसाबद्दल आस्था आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांनी 106 हुतात्म्यांचे बलिदान माहीत आहे. त्या सर्वांनी एकत्र बसून विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, मनसेला मानणारा मोठ वर्ग मराठी आहे. भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गांभीर्याने पावले टाकावी लागतील. तसेच राज ठाकरे यांच्याविषयीच्या प्रश्नावर त्यांनी अशी भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा – Supriya Sule : आत्मपरीक्षण करू आणि महाराष्ट्रासाठी…; पराभवाच्या 24 तासांनंतर सुळेंची प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, जी मंडळी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती, आता त्यांचेत अस्तित्व पणाला लागले आहे. त्यामुळे आता त्यांना मनसेची गरज वाटते. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे, यासाठी आम्ही स्वतःहून साद यापूर्वी घातली होती. आता जर त्यांनी साद घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील. समोरच्याची इच्छा काय आहे हे पाहिले जाईल. तसेच राज ठाकरे तर कधीही मैत्रीचा हात समोर करतात, असेही प्रकाश महाजन यांनी नमूद केले.
हेही वाचा – Rishabh Pant : पंत आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महागडा खेळाडू; श्रेयसची संधी 25 लाखाने हुकली