घरताज्या घडामोडीटाटा समूहाचे हब नागपूरमध्ये होण्यासाठी नितीन गडकरींचे टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र

टाटा समूहाचे हब नागपूरमध्ये होण्यासाठी नितीन गडकरींचे टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र

Subscribe

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरला होणारा C-295 लष्करी विमान वाहतुकीचा प्रकल्प आता गुजरातच्या वडोदऱ्याला होणार आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या या प्रकल्पावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटाचा प्रकल्प नागपुरमध्ये अशी विनंती केली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरला होणारा C-295 लष्करी विमान वाहतुकीचा प्रकल्प आता गुजरातच्या वडोदऱ्याला होणार आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या या प्रकल्पावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटाचा प्रकल्प नागपुरमध्ये अशी विनंती केली आहे. यासाठी नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे. (tata group project should be in nagpur nitin gadkari letter to tata sons chairman tata airbus)

या पत्रात नितीन गडकरी यांनी, टाटा समुहाच्या विविध उद्योग आणि व्यापाराच्या अनुषंगाने नागपूरच्या मिहानमध्ये एसईझेड आणि नॉन एसईझेड अशा दोन्ही प्रकारचे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या विविध उद्योगांसाठी मोठे गोदाम या ठिकाणी तयार करता येणार आहे. नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचे विमानांसाठीचे एमआरओ असून टाटा समूह भविष्यातील व्यापार विस्ताराच्या संधीकडे पाहून मिहानमध्ये आणखी एमआरओ उभारू शकतो. तसेच स्वत:च्या एअरलाईन्ससाठी आणि इतर एअरलाईन्ससाठी स्पेअर पार्टचे मोठे गोदाम उभारू शकतो, असे नमूद केले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे या पत्रात गडकरी यांनी कुठेही एअरबस सोबत टाटाचा प्रकल्पाबद्दल भाष्य केले नाही. तसेच, तो प्रकल्प नागपुरात येत आहे किंवा टाटांनी तो प्रकल्प नागपुरात आणावे, असे नमूद केलेले नसल्याचे समजते.

दरम्यान, C-295 लष्करी विमान वाहतुकीचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हरीभाऊ बागडे यांच्याकडून निवृत्तीचे संकेत, पण राजकारणातच राहणार सक्रिय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -