घरताज्या घडामोडीTaxi fare hike : या तारखेपासून भाडेवाढ करणारच, टॅक्सी संघटनांचा इशारा

Taxi fare hike : या तारखेपासून भाडेवाढ करणारच, टॅक्सी संघटनांचा इशारा

Subscribe

देशात पेट्रोल-डिझेलसह सीएनजीच्या दरात मोठी दरवाढ होताना दिसत आहे. सततच्या सीएनजी दरवाढीमुळे टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाहीये. परंतु १ जूनपासून आम्ही भाडेवाढ करणारच, असा इशारा टॅक्सी संघटनांनी केला आहे. गेल्या काही दिवसात सीएनजीचे दर ५१ रुपये ९८ पैशांवरून ७६ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे ५ रूपये भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाने केली आहे.

सीएनजी आणि पेट्रोल दरात सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ परवडणारी नसल्याने टॅक्सी, रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. त्यानुसार भाडेवाढीची चाचपणी परिवहन विभागाने सुरू केली आहे. किमान दोन ते तीन रूपयांनी रिक्षाचे भाडे वाढवण्याचा विचार सुरू असून टक्सी भाडेदर अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, टॅक्सी संघटनांनी किमान ५ रूपये भाडेवाढीची मागणी केली आहे.

- Advertisement -

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. मात्र, टॅक्सी संघटनांना भाडेवाढ द्या, अन्यथा आम्हाला थेट भाडेवाढ करावी लागेल, तसेच १ जूनपासून आम्ही भाडेवाढ सुरू करू, अशा इशारा
टॅक्सी संघटनांनी दिला आहे.

सीएनजीच्या दरात ३५ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ असून त्यामुळे परिवहन विभागाने टॅक्सी दरात किमान पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. परिवहन विभागाकडून निर्णय घेण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करत चालकांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे युनियनचे सरचिटणीस ए.एल.क्वाड्रोस यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, खासदार संजय राऊतांचा टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -